सावंतवाडी : धाकोरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर १ येथे दुर्ग मावळा प्रतिष्ठान व दुर्ग रक्षक प्रतिष्ठान कडून शिवकालीन दुर्मिळ ऐतिहासिक साधनांचे प्रदर्शन तसेच छत्रपती श्री शिवाजी महाराज व छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथेचा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी गोडी निर्माण करणे, नव्या पिढीला ऐतिहासिक दृष्ट्या सक्षम बनविणे, दुर्गसंवर्धनाचे महत्त्व पटवून देणे आणि शिवकालीन वारशाची जाणीव करून देणे या मुख्य उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाला धाकोरे सरपंच स्नेहा मुळीक, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष यशश्री पवार, उपाध्यक्ष रविंद्र मुळीक, पोलीस पाटील धाकोरे श्रीराम प्रभुराळकर, पोलीस पाटील रेडी सिताराम राणे, दिपाली वैज, बबिता गावडे, इतिहास संशोधक ज्ञानेश्वर राणे, दुर्ग रक्षक प्रतिष्ठानचे आबा चीपकर तसेचं मदन मुरकर, निलेश परब, नितेश तेली, निखिल पुळास्कर, नितिन गावडे यांच्यासह धाकोरे ग्रामस्थ उपस्थित होते.
या प्रदर्शनामध्ये मराठा शस्त्रागारातील मराठा धोप, दांडपट्टा, कट्यार, बिचवा, वाघनखे, खंडा तलवार, नागीन तलवार, ढाल, जिरेटोप, तोफेची प्रतिकृती तसेच शिवकालीन ऐतिहासिक संदर्भग्रंथ मांडण्यात आले होते. हे प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी विशेष आकर्षण ठरले. यावेळी इतिहास अभ्यासक ज्ञानेश्वर राणे यांनी विद्यार्थ्यांना शिवकालीन वस्तूंची प्रात्यक्षिकांसह माहिती दिली. अफजलखान वधावेळी वापरण्यात आलेल्या वाघनखांची माहिती सांगताना त्यांनी तो ऐतिहासिक प्रसंग जणू प्रत्यक्ष डोळ्यांसमोर उभा राहील अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. तसेचं विविध दुर्गांची माहिती देत शिक्षणात्मक सत्रही घेण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शिवकालीन शस्त्रे हाताळून त्यांची माहिती व अनुभव घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक दिगंबर तळणकर, सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक सोनल जाधव, तर आभार प्रदर्शन व कार्यक्रमाचे नियोजन सहाय्यक शिक्षिका प्रेरणा गोवेकर यांनी केले.

















































































































































































































































































.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.