loader
Breaking News
Breaking News
Foto

साखरोळी मोरेवाडीच्या प्रणय कांबळे याचे नवोदय परीक्षेत सुयश

खेड - जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत जिल्हा परिषदेच्या साखरोळी मोरेवाडी शाळेचा विद्यार्थी प्रणय प्रशांत कांबळे यांनी ९३. ५० टक्के गुण मिळवून नवोदय विद्यालयामध्ये दिमाखात प्रवेश मिळवला. 1948 ला स्थापन झालेल्या या शाळेतील विद्यार्थ्यांची पहिल्यांदाच जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाल्यामुळे या विद्यार्थ्याने शाळेच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

साखरोळी मोरेवाडी ही शाळा खेड तालुक्यातील दुर्गम शाळा म्हणून ओळखली जाते. स्पर्धा परीक्षेमध्ये साखळी शाळेचे नाव उंचावण्याचे स्वप्न येथील शिक्षकांनी गेली दोन वर्ष पाहिले होते यासाठी गेली दोन वर्षे शिष्यवृत्ती मार्गदर्शक राजेश भागणे शाळेचे मुख्याध्यापक अनिल यादव, अमोल सकपाळ, कृष्णा गंभीरे या सर्वांनीच अहोरात्र मेहनत घेऊन सर्वसामान्य कुटुंबातील या विद्यार्थ्याला जवाहर नवोदय विद्यालय पडवे येथे प्रवेश मिळवून दिला. खेडचे गटशिक्षणाधिकारी त्याचप्रमाणे खेड बीटाचे विस्तार अधिकारी विजय बाईत यांनी व्हिजन खेड अंतर्गत साखरोळी मोरेवाडी या शाळेकडे विशेष लक्ष दिले होते.

टाईम्स स्पेशल

साखरोळी मोरेवाडी शाळेने मिळवलेल्या या अभूतपूर्व यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश मोरे सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य ग्रामस्थ पालक यांच्याकडून प्रणय कांबळे व सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg