रत्नागिरी - आ.रा.स. अकॅडमी रत्नागिरीच्या रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणातील एकमेव सैन्य आणि पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणासाठीच्या मैदानाचा भव्य उद्घाटन सोहळा दिनांक १७ मार्च २०१७ रोजी सकाळी अकरा वाजता मोठ्या दिमाखात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख उद्घाटक म्हणून रत्नागिरी जिल्ह्याचे सामाजिक नेते आणि ज्येष्ठ उद्योजक आण्णा सामंत यांची उपस्थिती होती. त्यांच्या शुभहस्ते या मैदानाचे श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर व्यक्तींची उपस्थिती होती तसेच या मैदानासाठी कोणतेही मूल्य न घेता, विना मोबदला पूर्णतः मोफत जमीन उपलब्ध करून देणार्या श्री सांब रवळनाथ खारभूमी लाभार्थी सहकारी संस्थेचे सर्व सदस्य यांनी उपस्थिती लावली होती.
तसेच चिंचखरी सोमेश्वर पंचक्रोशी मधील अनेक मान्यवर सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थ्यांची बहुसंख्येने उपस्थित होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये श्री स्वामी समर्थ एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष विलास भोसले निवृत्त पोलीस उपाधीक्षक आणि श्री स्वामी समर्थ एज्युकेशन सोसायटीचे सदस्य राजन भाटकर यांचे प्रमुख योगदान होते. अनेकांच्या सहकार्यामुळे आणि मेहनतीमुळे आज आ.रा.स. अकॅडमी रत्नागिरी परिवार एका नवीन प्रवास सुरुवात करत आहे. या मैदानावरती पोलीस भरती, रेल्वे आरपीएफ भरती, वनरक्षक भरती, अग्नीवीर, आर्मी, नेव्ही, एअर फोर्स, एस.आर.पी.एफ., सी.आर.पी.एफ., बी.एस.एफ., लोहमार्ग पोलीस, एसएससी जीडी यासारख्या अनेक वर्दीतील स्पर्धा परीक्षांची तयारी आता रत्नागिरी मध्येच राहून विद्यार्थ्यांना करता येणार आहे.
या तयारी करिता विद्यार्थ्यांना मैदानी परीक्षा, लेखी परीक्षा अशा दोन्ही स्तरावर मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिले जाणार आहे. याचबरोबर बारा तासाची अभ्यासिका सर्व विषयाच्या नोट्स आवश्यक ते सर्व संदर्भ पुस्तके तसेच वेळोवेळी तज्ञ मार्गदर्शकाचे मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. अशी माहिती आ.रा.स.अकॅडमी रत्नागिरीचे संचालक एडवोकेट राकेश सत्वे यांनी दिली. आण्णा सामंत यांनी अकॅडमीच्या स्पर्धा परीक्षा उपक्रमाचे मनापासून कौतुक केले तसेच या कामांमध्ये कोणत्याही प्रकारचे सहकार्य व मदत देण्यासाठी त्यांनी मनापासून तयारी दर्शवली. आ.रा.स. अकॅडमी रत्नागिरी परिवारातर्फे सर्व मान्यवरांचे आणि प्रमुख अतिथींचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले.





























































































































































































































































.jpg)




.jpg)









































































































































.jpg)


























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.