loader
Breaking News
Breaking News
Foto

माऊली महिला नमन मंडळ रत्नागिरी लोकनृत्य स्पर्धेत द्वितीय

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - रत्नागिरी नगर परिषदमार्फत महिला दिनाचे औचित्य साधून स्वा.वि.दा.सावरकर नाट्यगृह रत्नागिरी येथे नुकत्याच विविध प्रकारच्या स्पर्धा संपन्न झाल्या. या कार्यक्रमामध्ये झालेल्या लोकनृत्य स्पर्धेत माऊली महिला नमन मंडळाने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. नगराध्यक्षा सौ.शिल्पाताई सुर्वे यांच्या हस्ते व नगरसेविका यांच्या उपस्थितीत रोख रु ७०००/व चषक देवून नमन मंडळाला गौरवांकित करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्पर्धेत मंडळाच्या अध्यक्षा प्रेरणा विलणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूनम गोळपकर, तन्वी नागवेकर, रेश्मा शिंदे, सर्वता चव्हाण, रिमा देसाई, शीतल सकपाळ, ज्योती कदम, स्वीटी पावसकर, शोभना वडपकर, मनस्वी साळवी, आदिती पवार, शिवानी मयेकर या कलाकारांनी सहभाग घेतला होता. पार्श्वगायिका आकांक्षा वायंगणकर, कोरस मानसी साळवी, विणा भागवत, वेदा शेट्ये, अर्चना मयेकर, साथसंगत परशुराम घवाळी, साई घवाळी, पार्तेज आंबेरकर यांनी केली होती. रंगभूषा सागर मायंगडे तर विशेष सहाय्य शरद गोळपकर, मदन डोर्लेकर, समिक्षा वालम, विनया काळप, माधवी पाटिल, दादा वाडेकर यांनी केले. या नमन मंडळाने यापूर्वी शिवाजी मंदिर दादर तसेच रत्नागिरी जिह्यात ३५ नमन प्रयोगही सादर केले आहेत. सर्व महिला एकत्र येवून पुरुषांच्या बरोबरीने ह्या महिला नमन कला सादर करत आहेत त्याबद्दल त्यांचे महाराष्ट्र राज्यात सर्वत्र कौतुक होत आहे. या कलाकारांना मोलाचे मार्गदर्शन नमन सम्राट यशवंत वाकडे व वासुदेव वाघे यांचे लाभत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg