loader
Breaking News
Breaking News
Foto

पाळ्ये गावच्या रस्त्याची झाली 'चाळण'; प्रशासनाच्या सुस्त कारभारामुळे ग्रामस्थांचा संताप

तिलारी (प्रतिनिधी) : दोडामार्ग-विजघर(पाळये तिठा)मुख्य रस्त्यापासून पाळये गावाकडे जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या रस्त्याची कमालीची दुरवस्था झाली असून, या मार्गावर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्याची अक्षरशः 'चाळण' झाल्याने येथून प्रवास करणे म्हणजे जीव मुठीत धरून 'तारेवरची कसरत' करण्यासारखे झाले असून, दररोज अपघातांना निमंत्रण मिळत आहे. प्रशासनाच्या या ढिसाळ आणि निष्काळजी कारभारामुळे पाळये ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, याबाबत पाळये ग्रामस्थांनी सावंतवाडी जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग आणि दोडामार्ग पंचायत समितीला लेखी निवेदन सादर केले आहे. शालेय विद्यार्थी, रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांचे हाल थांबवण्यासाठी प्रशासनाने या प्रश्नावर युद्धपातळीवर तोडगा काढावा, अशीच माफक अपेक्षा पाळयेवासीयांकडून व्यक्त केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg