loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी लोकअदालतीत विखुरलेले संसार पुन्हा फुलले; दोन वर्षांच्या वादावर पडदा, दाम्पत्य पुन्हा एकत्र!

सावंतवाडी (प्रतिनिधी) : "विधी सेवा समिती" आणि "लोकअदालत" हे केवळ वादावर तोडगा काढण्याचे व्यासपीठ नसून ते तुटलेली मने जोडण्याचेही केंद्र ठरू शकते, याचा प्रत्यय सावंतवाडी येथे आला. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेला एका विवाहित दाम्पत्याचा टोकाचा वाद मिटवण्यात यश आले असून, राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून या जोडप्याने पुन्हा एकदा सोबत नांदण्याचा निर्णय घेतला आहे. ​सदर प्रकरणात पती-पत्नीमध्ये मागील दोन वर्षांपासून सतत खटके उडत होते. वादाचे मुद्दे आणि भांडणे इतकी टोकाची होती की, तालुका विधी सेवा समितीने अनेकदा प्रयत्न करूनही त्यात यश येत नव्हते. अनेकवेळा दोन्ही पक्षकारांना एकत्र बसवून, तासनतास चर्चा करूनही समझोता होत नव्हता. मात्र, राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये परिस्थितीने सकारात्मक वळण घेतले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हे संवेदनशील प्रकरण सामंजस्याने हाताळण्यासाठी तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्षा तथा दिवाणी न्यायाधीश श्रीमती जे. एम. मिस्त्री आणि पॅनल सदस्य ॲड. सुखानंद सावंत व तालुका वकील संघटना यांनी विशेष परिश्रम घेतले. 'नांदा सौख्यभरे' ही भूमिका डोळ्यासमोर ठेवून अतिशय नाजूकपणे या वादातील गुंता सोडवण्यात आला. ​दोन्ही बाजूंचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत, त्यांना भविष्यातील सुखी संसाराचे महत्त्व पटवून देण्यात आले. अखेर, या दाम्पत्याने जुने वाद विसरून पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला. ​या यशस्वी तडजोडीमुळे केवळ संबंधित दाम्पत्याच्याच नव्हे, तर दोन्ही कुटुंबांमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. एका विखुरलेल्या वैवाहिक जीवनात या निकालामुळे नव्याने चैतन्य निर्माण झाले असून, लोकअदालतीच्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg