loader
Breaking News
Breaking News
Foto

विद्यार्थ्यांनी नियमित वेळेच्या वेळी अभ्यास केल्यास उत्तम यश हमखास : ऍड सुधीर बुटाला

खेड (प्रतिनिधी) - जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यां स्वतःला काही प्रमाणात कमी समजतात परंतु तसे काही नसावे, कित्येक नामवंत व्यक्ती ह्या जिल्हा परिषद शाळेतून शिकून पुढे मोठ-मोठे राजकारणी, शास्त्रज्ञ, वकील, न्यायाधीश, इंजिनियर इ. म्हणून उदयास आले आहेत. त्यापैकी मी स्वतः एक दुसरे ऍड प्रा. दिलीप चव्हाण, माजी मंत्री शिवसेना नेते रामदास भाई कदम, माजी सरन्यायाधीश गवई अशी कितीतरी नावे घेता येतील. परंतु विद्यार्थ्यांनी एक सूत्र लक्षात ठेवावे ते म्हणजे नेहमीच वेळच्या वेळी वाचन-लिखाण असा अभ्यास केल्यास उत्तम यश हमखास ठरलेलेच आहे, असे प्रतिपादन खेड सत्र न्यायालयातील ज्येष्ठ विधीज्ञ खेड बारचे अध्यक्ष आणि शिवसेना शिंदे गट लीगल सेलचे जिल्हाध्यक्ष सुधीर बुटाला यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा सुसेरी नंबर एक येथील विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी समुपदेशन कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. ऍड सुधीर बुटाला यांचे मित्र शिवसेना लीगल सेल तालुका खेड अध्यक्ष ऍड दिलीप चव्हाण यांनी सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कमी वेळेत जास्त अभ्यास कसा केला जातो, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक संजीत घाग यांनी ॲड बुटाला, ऍड. चव्हाण यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. असेच कार्यक्रम शिवसेना लीगल सेल तर्फे प्रत्येक ठिकाणी होणे गरजेचे आहे, असे मुख्याध्यापक संजीत घाग म्हणाले.

टाईम्स स्पेशल

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका विजया जोशी यांनी आपल्या विशेष शैलीत करून विद्यार्थी व पालकांची मने जिंकली. कार्यक्रमाची व्यवस्था शिक्षिका साक्षी रजपूत तर आभार प्रदर्शन शिक्षक संजय साळुंखे यांनी केले. शिवसेना लिगल सेलच्या विद्यार्थी मार्गदर्शन व समुपदेशन कार्यक्रमास सुशेरी गावातील व पंचक्रोशीतील मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg