loader
Breaking News
Breaking News
Foto

दर्यावर्दी प्रतिष्ठान आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे जिल्हा क्रीडाधिकारी विजय शिंदे यांच्या शुभहस्ते उद्घाटन

वेळणेश्वर (उमेश शिंदे) : दर्यावर्दी प्रतिष्ठान च्या रौप्य महोत्सवी वर्षा च्या समारोप सोहळ्यानिमित्त जिल्हा कबड्डी असोसीएशनच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडाधिकारी श्री.विजय शिंदे यांच्या शुभहस्ते व डॉ. विनोद शिंदे, क्रीडासंचालक, गोगटे-जोगळेकर, महाविद्यालय, रत्नागिरी यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ.विनोद शिंदे, क्रीडासंचालक, गोगटे-जोगळेकर, महाविद्यालय, रत्नागिरी तसेच प्रमुख मान्यवर म्हणून ॲड.अपूर्वा बारगोडे, रत्नागिरी जिल्हापरिषद सदस्य निलेश सुर्वे, गुहागर पंचायत समिती सदस्य रेणुका ओतारी, राष्ट्रीय खेळाडू अखिल भारतीय नागरी सेवा बुद्धिबळ व विकास दाभोळकर,अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र मच्छिमार-कष्टकरी खलाशी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

टाईम्स स्पेशल

यावेळी दर्यावर्दी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष पावरी, उपाध्यक्ष भिकाजी पालशेतकर, सचिव दिनेश जाक्कर व दर्यावर्दी प्रतिष्ठानच्या महिला मंडळ अध्यक्षा मेघा पाटील यांच्या सोबत संस्थेचे अन्य पदाधिकारी, कार्यकारी मंडळ सदस्य, सभासद व क्रीडारसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन समारंभापूर्वी भव्य क्रीडाज्योतीचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश पाटील यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg