loader
Breaking News
Breaking News
Foto

अंजनीमाता शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या सहाव्या मोफत वाचनालयाचे उद्घाटन

पनवेल (वार्ताहर) : अंजनी माता शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तसेच भिनार गावचे पोलीस पाटील हरेश कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून कै.विश्वनाथ तांबोली यांच्या स्मरणार्थ कामोठ्याचा विघ्नहर्ता मंडळ वाचनालय सह्याद्री विद्यालय टेंभुर्ली येथे मोफत वाचालय सुरू करण्यात आले. ही संस्थेची सहावी शाखा आहे. 100 वाचनालय सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे. टेंभुर्ली येथील शिक्षक, पालक आणि मांजरे पोलीस पाटील भरत चौधरी यांचा आग्रह होता की त्यांच्याकडे वाचनालय व्हाव. त्यासाठी त्यांनी संस्थेकडे पाठपुरावा केला. म्हणून संस्थेने त्यांच्याकडे वाचनालय सुरू केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वाचनालयाचे उद्घाटन उद्योजक सचिन तांबोळी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यांनी सदर वाचनालयसाठी मोठी आर्थिक मदत केली. संस्थेचे प्रास्ताविक सचिव जगदिश भोईर पोलीस पाटील साकुर्ली यांनी सादर केले. तर उपाध्यक्ष स्वागत विशे यांनी वाचनाचे महत्त्व काय आहे हे सांगितले. ग्रामविकास अधिकारी दीपिका परटोले, किरण जाधव, योगेश बांगर, दिपक देशमुख, प्रमोद पोंढेकर यांनी सुद्धा आपल्या भाषणातून प्रबोधन केले. प्रमुख वक्ते नवनीत यशवंतराव यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

टाईम्स स्पेशल

सदर कार्यक्रमासाठी जयवंत आरज, शाहू भोसले, सुमित पानसांडे, अजय पाटील, संजय पुर, अक्षय सुळे, काशिनाथ चौधरी, हरिश्चंद्र विशे, भरत डोहले, वसंत चौधरी, सुरेश चौधरी, वैभव विशे हे मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे प्रसिद्धीप्रमुख संदिप आरज, सतीश कुलकर्णी, आदिनाथ देशमुख,शाळेचे मुख्याध्यापक देशमुख व सर्व शिक्षक वृंद यांनी विशेष मेहनत घेतली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक पांडुरंग भेरे यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव जगदिश भोईर यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg