loader
Breaking News
Breaking News
Foto

रिक्षा सुंदरी’ स्पर्धेत जयंत धावडे प्रथम, तर ट्रॅक स्पर्धेत पारस राणे विजयी

राजापूर (तुषार पाचलकर) - राजापूर तालुक्यातील रायपाटण येथे होळी उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेली ‘रिक्षा सुंदरी’ व रिक्षा ट्रॅक स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सलग दुसऱ्या वर्षी आयोजित या स्पर्धेला परिसरातील रिक्षा व्यवसायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आकर्षक सजावट व कौशल्यपूर्ण रिक्षा चालविण्याच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. या स्पर्धेचे आयोजन रायपाटण येथील रिक्षा व्यावसायिक प्रकाश बापू राणे यांनी केले होते. स्पर्धा दोन प्रकारांत घेण्यात आली होती. यामध्ये ‘रिक्षा सुंदरी’ (आकर्षक सजावट) आणि ट्रॅकवर रिक्षा चालविण्याची स्पर्धा यांचा समावेश होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रिक्षा सुंदरी (सजावट) स्पर्धेत पाचल रिक्षा मालक चालक संघटनेचे जयंत धावडे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला, तर प्रकाश राणे यांनी द्वितीय, तर पारस राणे यांनी तृतीय क्रमांक मिळविला. ट्रॅक स्पर्धेत पारस राणे प्रथम, विजय रोग्ये द्वितीय, तर राजू शेट्ये तृतीय ठरले. विनायक गुरव व बाळू राणे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेसाठी संतोष रेवाळे यांनी पंच म्हणून काम पाहिले. विजेत्यांना रोख बक्षीस व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. बक्षीस वितरण श्री वडची आई मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विनायक शेट्ये व अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य उमेश पराडकर, गावकर सुधीर रोडे, रवींद्र बांबरकर, किशोर गुरव, मंगेश पराडकर, विनायक लिंगायत, अमोल शेटे, दिलीप शेटे, कुणाल गांगण, दीपक मालप, बाळा शेट्ये, सुदेश कोलते आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेची जल्लोषात सांगता झाली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg