loader
Breaking News
Breaking News
Foto

तवसाळ प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न

तवसाळ - तवसाळ प्रिमियर लीग पर्व पहिले क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. फित कापून तसेच चषकाचे अनावरण करुन स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. यावेळी टीशर्टचे ही अनावरण करण्यात आले. या स्पर्धेत आठ संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे थेट प्रक्षेपणही करण्यात आले. या स्पर्धेला क्रिडाप्रेमींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. तसेच गुहागर कुणबी युवक मंडळ अध्यक्ष सुनिल ठोंबरे यांनी सदिच्छा भेट दिली. तवसाळ डायनॅमिक संघ-विजेता, तवसाळ स्टार्स- उपविजेता, बेस्ट क्षेत्ररक्षण- आरंभ विनोद वाघे, बेस्ट गोलंदाज- नितेश वसंत पाडदळे, बेस्ट फलंदाज- सागर प्रकाश निवाते, मालिकावीर- दिवेश दिलीप येद्रे पहिल्या प्रिमियर लीगचे मानकरी ठरले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत स्पर्धेची सांगता करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg