loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा कुवे नगरपंचायतीचा ३० कोटीचा अर्थसंकल्प जाहीर

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) : लांजा कुवे नगरपंचायतीच्या वतीने ३० कोटीचा अर्थ संकल्प जाहीर करण्यात आला आहे. लांजा शहराच्या विकासाला गती देणारा अर्थ संकल्प असल्याचे बोलले जात आहे. लांजा कुवे शहराच्या सर्वांगीण विकासाबरोबर येथील जनतेला पायाभूत सुविधा देण्याची जबाबदारी नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांवर आहे. नुकताच नगरपंचायतीच्या वतीने शासनाकडून या अर्थ संकल्पाद्वारे विकास कामांना निधी मिळाल्यास ख-या अर्थाने लांजा कुवे शहराच्या विकासाला चालना मिळेल, असे बोलले जात आहे. गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत येथील नगरवासियांना मुलभूत सुविधांपासून वंचित रहावे लागले हे जनतेचे दुर्दैव असल्याचे बोलले जात आहे. मुंबई-गोवा हायवे लगतच लांजा शहर असल्यामुळे लांजा शहर स्मार्ट सिटी होणे अत्यावश्यक असून तालुक्याच्या सौंदर्यात भर पडणार आहे. त्या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

लांजा शहरात मोठ मोठी व्यापारी संकुले, निवासी संकुले उभी रहात असून या एकमेव विकासात लांजा शहर आघाडीवर असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आजही लांजा शहरात ड्रेनेजची समस्या गंभीर बनली आहे. शहरातील सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी भुयारी गटारांचा प्रश्न आहे. शहरातील अंतर्गत रस्त्याचा प्रश्न, उनाड जनावरांचा प्रश्न, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त, पिण्याच्या पाण्याची समस्या, स्ट्रीट लाईट, मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण, आठवडा बाजारातील फिरत्या व्यापारांना जागेचा प्रश्न असून एकाच ठिकाणी मंगळवार आठवड्याचा बाजार भरण्यात यावा, ही मागणी जनतेतून केली जात आहे. लांजा शहरातील जनतेला मुलभूत सुविधा सक्षम करण्यासाठी जातिनिशी लक्ष देताना शहराचा सर्वांगीण विकास साधत लांजा स्मार्ट शहर केव्हा होणार? याची प्रतिक्षा लांजा कुवे नगरवासिय करीत आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg