loader
Breaking News
Breaking News
Foto

जानवळे येथे सेवानिवृत्त व्यक्तींचा सत्कार

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील जानवळे श्री संत रोहिदासवाडी येथे पालखी महोत्सवा निमित्त सेवानिवृत्त झालेल्या व्यक्तींचा सत्कार समारंभ संपन्न झाला. सेवानिवृत्त झालेल्या व्यक्तींमध्ये धर्मदास जानवळकर,गणेश जानवळकर,पंढरी जानवळकर, कविता जानवळकर, रमेश जानवळकर, प्रेरणा जानवळकर,श्रीम. लक्ष्मी जानवळकर ,श्रीम. कांचन जानवळकर,श्रीम. विमल जानवळकर, अशोक जानवळकर, दिपक जानवळकर, रघुनाथ जानवळकर, नामदेव जानवळकर,संतोष जानवळकर, सुरेश जानवळकर,उत्तम जानवळकर, मंगेश जानवळकर,शरद जानवळकर,रमेश जानवळकर,राजाराम जानवळकर, विष्णू जानवळकर, प्रकाश जानवळकर, सुरेश पेवेकर आदी सेवानिवृत्त झालेल्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना शाल, श्रीफळ व भेटवस्तु देवून गौरविण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पालखी महोत्सवाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पालखीचे घरोघरी पूजन, श्रीसत्यनारायणची वार्षिक पूजा, पालखी नाचविणे, वाडीतील कलाकारांचे विविध कलांचे सादरीकरण , ढोल वादन रेकॉर्ड डान्स, बासरी वादन, गायन, संगीत खुर्ची फनी गेम्स असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थ, महिला बहसंख्येने उपस्थित होते. या स्तुत्य उपक्रमाविषयी मंडळातील सदस्यांचे व आयोजकांचे कौतुक करण्यात आले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg