खेड - श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज खेड येथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य व शिक्षण महर्षी तू.बा.कदम प्रतिष्ठान खेड यांच्या संयुक्त विद्यमाने करियर गायडन्स व वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिजाऊ प्रतिष्ठानचे प्रवक्ते अमर राऊत यांनी प्रतिष्ठान व संस्थापक निलेश सांबरे यांच्या कार्याची माहिती दिली. राज्यभरात चाललेल्या विविध सामाजिक कार्याची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली. अमित कदम यांनी शिक्षण महर्षी तु.बा.कदम प्रतिष्ठानविषयी माहिती दिली. त्यानंतर संदीप पाटील यांनी इयत्ता दहावी व बारावीनंतर विद्यार्थ्यांना असलेल्या करिअरच्या संधी याविषयी माहिती दिली. गरिब मुलांनी शिक्षण घ्यावे, शिक्षण प्रवाहात रहावे या दृष्टीने प्रतिष्ठानने चालविलेल्या वेगवेगळ्या योजनांची माहिती सुद्धा दिली.
स्कूल कमिटी चेअरमन मा.श्री.राजेशभाई बुटाला साहेब यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात भविष्यात आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना करियर संदर्भात मार्गदर्शन त्याचबरोबर व्यवसाय माहिती केंद्रासंदर्भात आपले सहकार्य घेऊन संस्थेमध्ये तसेच नगरपालिकेमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या योजना अमलात आणू, याची ग्वाही दिली व दोन्ही प्रतिष्ठानचे समाज उपयोगी कार्य चालू असल्याबद्दल अभिनंदन केले. आपल्या भाषणात त्यांनी शिक्षण महर्षी तू . बा .कदम यांच्या शैक्षणिक कार्याची ओळख सुद्धा करून दिली. त्यानंतर मान्यवरांच्या शुभहस्ते सुमारे ७०० विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. प्रतिष्ठानच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेवक स्वप्नील सैतवडेकर व सौ. वैभवी खेडेकर यांचा सत्कार करण्यात आला. सर्वांनीच प्रतिष्ठानच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल कौतुक केले.








































































































































































































































.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.