loader
Breaking News
Breaking News
Foto

माजी कृषी अधिकारी, शशिकांत पवार यांचे निधन

खेड - खेड तालुक्यातील माजी कृषी अधिकारी, शशिकांत महादेव पवार यांचे गुरुवार दिनांक १२/०३/२०२६ रोजी दुःखद निधन झाले. मृत्यसमयी त्यांचे वय ७८ वर्षे होते, त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, जावई, सून, आणि नातवंडे, असा मोठा परिवार आहे. तसेच त्यांचा मित्र परिवार देखील मोठा आहे. त्यांच्या प्रेमळ स्वभावाने त्यांनी सर्वांना आपलेसे करून घेतले होते. लाडके व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती होती, अनेक लोकांचा आधारस्तंभ बनले, त्यांनी आपल्या नाथजोगी समाजासाठी आर्थिक योगदानसह समाजाच्या विविध कार्यात मोलाचे काम केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शासनाच्या कृषी खात्यात ३९ वर्ष सेवा देवून तालुका कृषी अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जाण्याने कधीही न भरून निघणारी अशी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे बारावे/ तेरावे उत्तर कार्य सोमवार दिनांक २३/०३/२०२६ रोजी प्रारंभ अपार्टमेंट, भरणे, शिवनेरी नगर, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी याठिकाणी असलेल्या त्यांच्या निवासस्थानी होणार आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg