सावंतवाडी : कोकणच्या मातीतील कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारा 'निरवडे महोत्सव २०२६' पहिल्यांदाच मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. निरवडे ग्रामस्थ व श्री देव महापुरुष कला क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा दोन दिवसीय सांस्कृतिक महाकुंभ येत्या ३ आणि ४ एप्रिल रोजी निरवडे, माळकरवाडी येथे रंगणार असून, या महोत्सवासाठी संपूर्ण पंचक्रोशीत उत्साहाचे वातावरण आहे.महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची म्हणजे शुक्रवार, ३ एप्रिलची सुरुवात सायंकाळी ६ वाजता स्थानिक शालेय विद्यार्थ्यांच्या बहारदार सामूहिक नृत्याने होणार आहे. यानंतर रात्री ८ वाजता किंजवडे देवगड येथील पावणादेवी समई नृत्याचा विशेष कार्यक्रम होणार आहे. पहिल्या रात्रीचे मुख्य आकर्षण म्हणजे 'इंडियन आयडॉल' फेम गणेश मेस्त्री यांची उपस्थिती असणार असून, त्यांच्या सोबतीने नेरूर येथील दिनेश मेस्त्री ग्रुपचा दिमाखदार 'शिमगोत्सव' सादर केला जाणार आहे.
दुसऱ्या दिवशी, शनिवार ४ एप्रिल रोजी महोत्सवाचा उत्साह अधिकच द्विगुणित होणार आहे. सायंकाळी ७ वाजता पुण्याचे ख्यातनाम शास्त्रीय गायक नागेश आडगावकर यांच्या विशेष सांगीतिक कार्यक्रमाने रसिक श्रोते मंत्रमुग्ध होतील. रात्री १० वाजता सिंधुदुर्ग येथील ओंकार डान्स अकॅडमी निर्मित 'नृत्याविष्कार' हा भव्य कार्यक्रम सादर केला जाईल. यामध्ये भारतीय आणि पाश्चात्य संस्कृतीचे दर्शन घडवण्यासोबतच छत्रपती संभाजी महाराज, मातंगी देवी आणि कालभैरव अशा पौराणिक व ऐतिहासिक विषयांवरील कलाविष्कार पाहायला मिळतील. विशेष म्हणजे राजा सामंत, बादल चौधरी आणि निलेश गुरव या दिग्गज निवेदकांच्या खटकेबाज शैलीत हा सोहळा पार पडणार आहे.
कार्यक्रमाची सांगता शनिवारी रात्री ११ वाजता 'भव्य लकी ड्रॉ' च्या निकालाने होईल. या संपूर्ण महोत्सवादरम्यान निखळ हास्य आणि विनोदाची मेजवानी देखील रसिकांना मिळणार आहे. या दोन दिवसीय भरगच्च कार्यक्रमाचा लाभ सर्व रसिक प्रेक्षकांनी वेळेवर उपस्थित राहून घ्यावा, असे नम्र आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.






























































































































































































































































.jpg)




.jpg)









































































































































.jpg)


























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.