loader
Breaking News
Breaking News
Foto

सीएसआर फंडातून खेड तालुक्यातील ४१ जि.प. शाळांना लॅपटॉपचे वाटप

खेड (प्रतिनिधी) - राज्यमंत्री ना.योगेश कदम यांचा वाढदिवस औचित्य साधून तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष, करटेल सुपुत्र दिनेश परशुराम चव्हाण यांच्या संकल्पनेतून सीएसआर फंडातून तालुक्यातील ४१ जिल्हापरिषद शाळांना लॅपटॉपचे वाटप करण्यात आले. वाटप करताना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, बिडीओ गणेश मंडलिक, सरपंच दिनेश चव्हाण, भगवान साळुंखे, विस्तार अधिकारी भोसले, सावंत, संतोष चव्हाण, कोळेकर, मगदूम, दळवी, खोपडे, घाग, शिंदे, तांबट, सौरभ जाधव, ग्रामस्थ, शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राज्यमंत्री योगेशदादा कदम यांचा वाढदिवस १८ फेब्रुवारी रोजी येतो पण त्याच दरम्यान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे दुःखद निधन झाल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. योगेशदादा कदम हे अधिवेशनामध्ये व्यस्त असल्याने हा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने करण्यात आला. लॅपटॉपचा लाभ प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना व्हावा हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला. यावेळी सर्वच मान्यवरांनी करटेलचे सरपंच दिनेश चव्हाण यांचे विशेष कौतुक केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg