loader
Breaking News
Breaking News
Foto

पेवे खरेकोंड ग्रामस्थ मंडळीच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह विविध कार्यक्रमांनी संपन्न

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील पेवे खरेकोंड ग्रामस्थ मंडळीच्या वतीने पेवे खरेकोंड, येथील हनुमान मंदिर येथे श्री गुरु बाबासाहेब आजरेकर फड, श्री क्षेत्र पंढरपूर श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज बीजोत्सव, संतश्रेष्ठ एकनाथ महाराज षष्ठी व पोथी वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह विविध कार्यक्रमानी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये काकड आरती, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, ग्रंथराज ज्ञानेश्वरी प्रवचन, सामुदायिक हरिपाठ, नित्य आरती, हरिकीर्तन, जागर असे विविध कार्यक्रम संपन्न झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमांमध्ये ह.भ.प. विठ्ठल महाराज वासकर, ह.भ.प. संतोष रामचंद्र सावरटकर, खरेकोंड, ह.भ.प. दीपक साळवी, खरेकोंड, ह.भ.प. सचिन साळवी खरेकोंड, ह.भ.प. सुधाकर निवळकर, कात्रोळी, ह.भ.प हरिदास रामभाऊ बोराटे माऊली आजरेकर फड प्रमुख पंढरपूर यांचे प्रवचन तसेच ह.भ.प गोविंद साळवी, खरेकोंड व ह.भ.प वासुदेव साळवी, खरेकोंड, श्री गुरु ह. भ. प. विठ्ठल महाराज वासकर, ह.भ.प. संतोष सावरटकर खरेकोंड ह.भ.प. अरविंद चव्हाण सावर्डे चिपळूण, ह.भ.प. सचिन साळवी खरेकों व ह.भ.प. विश्वंभर चाळके चिपळूण, ह.भ.प. नारायण पवार अनारी, श्री गुरु ह.भ.प. हरिदास रामभाऊ बोराटे माऊली आजरेकर फड प्रमुख पंढरपूर यांचे कीर्तन संपन्न झाले.

टाईम्स स्पेशल

अखंड हरिनाम सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी श्री गुरु ह.भ.प. हरिदास रामभाऊ बोराटे आजरेकर माऊली श्री क्षेत्र पंढरपूर यांचे काल्याचे किर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समस्त मुंबई मंडळ, ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ वारकरी संप्रदाय पेवे खरेकोंड यांनी विशेष मेहनत घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg