loader
Breaking News
Breaking News
Foto

Aqua Techniques Ratnagiri च्या जलतरणपटूंची दमदार कामगिरी, २३ पदकांची शानदार कमाई!

भवानी टँक, कोल्हापूर येथे पिराजीराव घाटगे फिजिकल एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित जलतरण स्पर्धेत Aqua Techniques, Ratnagiri Club मधील जलतरणपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करत आपला ठसा उमटवला. या स्पर्धेत क्लबमधील एकूण १७ जलतरणपटूंनी सहभाग घेतला आणि सर्वांनी उत्तम कौशल्य, मेहनत व जिद्द दाखवत एकूण २३ पदके जिंकली. रुद्र सरफरे (गट २) याने अनेक पदके जिंकून वैयक्तिक अजिंक्यपद पटकावले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

१. रुद्र सरफरे (गट २) - १०० मीटर IM – सुवर्णपदक, ५० मीटर बटरफ्लाय – सुवर्णपदक, ५० मीटर फ्रीस्टाईल – कांस्यपदक, ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक – कांस्यपदक, ५० मीटर बॅकस्ट्रोक – कांस्यपदक, ५० × ४ रिले – रौप्यपदक, २. क्रिषांग पखाले (गट १) - ५० मीटर फ्रीस्टाईल – रौप्यपदक, ५० मीटर बटरफ्लाय – रौप्यपदक, १०० मीटर IM – कांस्यपदक, ५० मीटर बॅकस्ट्रोक – कांस्यपदक, ५० × ४ रिले – रौप्यपदक. ३. केदार सुर्वे (गट ४) - २५ मीटर बटरफ्लाय – सुवर्णपदक, बॅकस्ट्रोक – कांस्यपदक. ४. आर्ना देवळेकर (गट ४) - बॅकस्ट्रोक – सुवर्णपदक, फ्रीस्टाईल – रौप्यपदक, बटरफ्लाय – रौप्यपदक, ब्रेस्टस्ट्रोक – कांस्यपदक.

टाइम्स स्पेशल

५. आन्वी मंजुळे, २५ मीटर बटरफ्लाय – कांस्यपदक, ६. जतिन भोसले - ५० × ४ रिले – रौप्यपदक. ७. हर्ष शेलार, ५० × ४ रिले – रौप्यपदक, ८. रेवा कोसुंबकर - २५ मीटर ब्रेस्टस्ट्रोक – रौप्यपदक. ९.ट्रिया विलणकर, २५ मीटर फ्रीस्टाईल – कांस्यपदक, २५ मीटर ब्रेस्टस्ट्रोक – कांस्यपदक. या यशाबद्दल सर्व जलतरणपटूंचे मनःपूर्वक अभिनंदन. आपल्या मुलांना दिलेल्या प्रोत्साहन व पाठिंब्यामुळे ही यशस्वी कामगिरी शक्य झाली. यासाठी सर्व पालकांचेही विशेष अभिनंदन. या स्पर्धेत जलतरणपटूंना कोच विवेक विलणकर यांचे उत्कृष्ट तांत्रिक मार्गदर्शन लाभले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg