loader
Breaking News
Breaking News
Foto

डी.जे. सामंत महाविद्यालयामध्ये तृतीय वर्ष कला व वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ

पाली - डी.जे. सामंत महाविद्यालयामध्ये तृतीय वर्ष कला व वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष महेश सामंत, प्रमुख पाहुणे राजेंद्रप्रसाद मसुरकर, सचिन कारेकर, आबलोली (गारवा कृषी पर्यटन केंद्राचे मालक), महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. कांता कांबळे, इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका नूतन कांबळे, सचिन सावेकर, संदेश चव्हाण, प्रा. ज्ञानेश्वर म्हात्रे उपस्थित होते. सदिच्छा समारंभाचे अध्यक्ष व संस्थेचे उपाध्यक्ष महेश सामंत यांनी जे विद्यार्थी महाविद्यालयातून उच्चशिक्षण घेऊन बाहेर पडतील त्या विद्यार्थ्यांनी समाजामध्ये आदर्शव्रत कार्य करावे. जेणेकरून त्या विद्यार्थ्यांची ओळख निर्माण होईल व त्यामुळे त्याचा स्वतःचा गौरव, त्याच्या आई-वडिलांचा गौरव व त्याच बरोबर महाविद्यालयाचाही गौरव होईल अशा प्रकारचे कार्य विद्यार्थ्यांकडून घडावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली व पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राजेंद्रप्रसाद मसूरकर यांचे करिअर गायडन्सवर , सचिन कारेकर गारवा कृषी पर्यटन केंद्र संचालक पर्यटनातून रोजगार निर्मिती यावर मार्गदर्शन केले. डी.जे.सामंत महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी (कोकण रेल्वेचे टी.सी., पोलिस विभागात कर्तव्य बजावत असेलेले, आणि प्राध्यापक म्हणून सेवेत असणारे) यांचा सत्कार करण्यात आला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg