loader
Breaking News
Breaking News
Foto

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना शासकीय समिती अध्यक्षपदी किशोर देसाई

दापोली (प्रतिनिधी) : दापोली विधानसभा मतदार संघाचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे गृह (शहरे) महसूल, ग्रामविकास व पंचायती राज, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषधी प्रशासन राज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या शिफारसीने शासन निर्णयास अनुसरून जालगाव जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य किशोर देसाई यांची २६३ दापोली विधानसभा क्षेत्रस्तरिय समिती करिता मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या दापोली विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे क्षेत्रप्रमुख म्हणून अत्यंत प्रभावीपणे काम करणारे दापोली तालुक्यातील जालगावचे सुपूत्र आणि रत्नागिरी जिल्हा परिषदचे सदस्य असलेले किशोर देसाई यांचे सामाजिक, राजकीय काम आणि त्यांची प्रशासनावर असलेली कमांड, शासकिय योजना कशा राबवाव्यात याचे असलेले उत्तम कौशल्य आणि नेतृत्व गुण यामुळे ते दापोली विधानसभा मतदार संघात कायमच चर्चेत राहिलेले असे एक नेतृत्व आहे. किशोर देसाईंच्या नियुक्तीमुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg