loader
Breaking News
Breaking News
Foto

पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान 2026 माभळे संगमेश्वर येथे उत्साहात संपन्न

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान 2026 हे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात राबविले जात आहे. रत्नागिरी मध्य मंडळामध्ये माभळे, संगमेश्वर येथे अभियान घेण्यात आले. भाजपा रत्नागिरी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी या एक दिवसीय निवासी प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन केले. यावेळी जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, रत्नागिरी मध्य मंडल तालुकाध्यक्ष प्रतिक देसाई, अभियान संयोजक संकेत कदम, तालुका सरचिटणीस राजेश आंबेकर, तालुका कोषाध्यक्ष दिपक आपटे, तालुका चिटणीस राजेंद्र कळंबटे, महिला जिल्हा सरचिटणीस नुपूरा मुळ्ये, महिला तालुका अध्यक्षा सुचिता नाचणकर, जि.उपाध्यक्ष संदीप नाचणकर, रत्नागिरी कृषी बाजार समिती सभापती संदिप सुर्वे, उपाध्यक्षा दीप्ती फडके, प्रसाद भिडे, जिल्हा उपाध्यक्षा अनुश्री आपटे, सरिता आंबेकर, मेधा देवस्थळी, सपना सावंत, अनुष्का शेलार, रोहिणी सुर्वे, मनाली सुर्वे, माधवी भिडे, विनय मुरकर, मंगेश साळवी, राकेश कदम, प्रमोद शेट्ये, मयूर निकम आदी पदाधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भारतीय जनता पक्ष हा कोणत्या विचारसरणीच्या आधारे चालतो, त्याचा आत्ता पर्यंतचा इतिहास काय हे कार्यकर्त्याला समजावे यासाठी असे वर्ग आयोजित केले आहेत असे जिल्हा अध्यक्ष प्रशांत यादव यांनी सर्वांना मार्गदर्शन करताना सांगितले. विविध विषयानुसार अभ्यासू वक्ते मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. वैचारिक अधिष्ठान तसेच कार्य विस्तार आणि आमची दृष्टी या विषयावर डॉ. अजित जोग, इतिहास आणि विकास या विषयावर उदय करमरकर, बुथ व्यवस्थापन ओंकार फडके, सोशल मीडिया निलेश मराठे, केंद्र व राज्य सरकारच्या योजना डॉ. हृषीकेश केळकर तसेंच आपली कार्य पद्धती या विषयावर नुपुरा मुळ्ये यांनी मार्गदर्शन केले. अभियानाची सुरुवात ही राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत तसेच प्रशिक्षण गीत म्हणून करण्यात आली. अतिशय उत्तम आणि शिस्तबद्ध पद्धतीने हे प्रशिक्षण संपन्न झाले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg