बांदा (प्रतिनिधी) - होळी पौर्णिमेपासून पंधरा दिवसांनी होणारी बांद्याची रंगपंचमी सोमवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सोमवारी बांद्याचा आठवडा बाजार असतो. यंदा रंगपंचमी सोमवारी आल्यामुळे आठवडा बाजार रविवारी भरवण्यात आला होता. सोमवारी सकाळपासून दिवसभर बांदयात सर्वत्र रंगाची उधळण सुरू होती. रविवारी सायंकाळी पारंपारिक "सुवारीचा रोंबाट " ही फेरी झाली. रात्री वैभवी क्रिएशन डिचोली निर्मित आणि अमर फाळके प्रस्तुत " जावई सायलेंट सासुबाई व्हायलेंट" हा दोन अंकी धमाल विनोदी नाट्य प्रयोग झाला . सोमवारी सकाळी बांदा बाजारपेठेतील श्री देव मांडकरी देवस्थान येथे पारंपारिक धार्मिक विधी झाल्यानंतर शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत रंगांची उधळण झाली व रंगपंचमीला आरंभ झाला. त्यानंतर दिवसभर संपूर्ण गावात जागोजागी रंगांची उधळण सुरू होती. ढोल, ताशे ,सनई,झांज या पारंपारिक वाद्यांसह डीजेच्या तालावरही नाचण्याचा आनंद जिथे तिथे घेतला जात होता. सायंकाळच्या सत्रात वाजत गाजत रोंबाट फेरी त्यानंतर होळीचा खुंट येथे प्रतिवार्षिक धार्मिक विधी आदी कार्यक्रम होते. गावात सर्वत्र लोकांनी या रंगपंचमी उत्सवाचा मनमुराद आनंद लुटला.
सामाजिक
२० मार्च रोजी विद्यामंदिर पावस येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर

















































































































































































































.jpg)




.jpg)





























































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.