loader
Breaking News
Breaking News
Foto

मेडिकव्हर रुग्णालयात पल्मोनरी एम्बोलिझम व मोठ्या आकाराच्या फायब्रॉइडवर यशस्वी शस्त्रक्रिया

नवी मुंबई: अचानक धाप लागणे, पोटऱ्यांमध्ये तीव्र वेदना, चक्कर येऊन कोसळणे आणि बेशुद्ध होणे, अशी गंभीर लक्षणे दिसल्यानंतर ५१ वर्षीय महिलेवर मेडिकव्हर हॉस्पिटल येथे तातडीने उपचार करून तिचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आले. रुग्णाला एकाच वेळी पल्मोनरी एम्बोलिझम (फुफ्फुसातील रक्ताची गुठळी) आणि गर्भाशयातील मोठा फायब्रॉइडसारखी दुहेरी गंभीर समस्या असल्याचे तपासणीत आढळले. या रुग्णावर उपचार करण्यासाठी डॉ. बादल ताओरी (इंटर्नल मेडिसिन), डॉ. अनुरंजिता पल्लवी (स्त्रीरोगतज्ञ), डॉ. धार्मिक भुवा (इंटरव्हेंशनल रेडिओलॉजिस्ट) आणि डॉ. विवेक (सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट) यांच्या बहुशाखीय पथकाने संयुक्तपणे उपचार केले. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिघी गावात राहणारी रुग्ण ओनिझा गीते हि जवळपास गेल्या आठ महिन्यांपासून आपल्या आरोग्याच्या समस्यांशी झुंज देत होती. या काळात तिचे वजन अत्यंत कमी झाले आणि तिला मासिक पाळीत वारंवार तीव्र रक्तस्राव होऊ लागला, ज्यामुळे हळूहळू रोगप्रतिकार शक्तीवर आणि दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ लागला. डॉक्टरांना भेटूनही तिच्या प्रकृतीत पाहिजे तशी सुधारणा दिसून आली नाही आणि लक्षणांची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच चालली होती. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी रुग्णाची प्रकृती अचानक बिघडली. घरात खाली वाकताना ती बेशुद्ध होऊन कोसळली, ज्यामुळे तिचे संपूर्ण कुटुंब अत्यंत काळजीत पडले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, तिला तातडीच्या उपचारांसाठी प्रथम स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिच्या प्रकृतीची गुंतागुंत लक्षात घेता, पुढील तपासणी आणि प्रगत उपचारांसाठी तिला मेडिकव्हर हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रुग्णालयात नेत असताना तिला तीव्र धाप लागणे, पायात गारठल्यासारखे वाटणे, अचानक तोल जाणे आणि वारंवार उलट्या होणे यांसारखी लक्षणे दिसून आली आणि ५ फेब्रुवारी, २०२६ रोजी रुग्णाला डॉ. बादल ताओरी यांच्या देखरेखीखाली रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेपूर्वी रुग्णाला जुलाब आणि पोटऱ्यांमध्ये सतत वेदना होत असल्याचेही तिने सांगितले. तिच्या लक्षणांची तीव्रता लक्षात घेऊन, तिला तात्काळ आयसीयूमध्ये (ICU) हलवण्यात आले. सीटी पल्मोनरी अँजिओग्राफी (CTPA) मध्ये मुख्य फुफ्फुसीय धमनीत (main pulmonary artery) एक जीवघेणा सॅडल-आकाराचा थ्रॉम्बस (रक्ताची गुठळी) असल्याचे निदान झाले, जो उजव्या आणि डाव्या दोन्ही फुफ्फुसीय धमन्यांपर्यंत पसरला होता. ही एक अशी स्थिती आहे, ज्यावर त्वरित उपचार न केल्यास ती प्राणघातक ठरू शकते. पुढील सीटी ॲबडोमेन इमेजिंगमध्ये गर्भाशयात एक मोठी लिओमायोमा (फायब्रॉइड) गाठ असल्याचे दिसून आले, ज्यात डीजनरेटिव्ह बदल झाले होते आणि ती झिफिस्टरनम (छातीच्या हाडाचा खालचा भाग) पर्यंत पोहोचली होती.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg