देवळे (प्रकाश चाळके) - कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकरी तसेच व्यापाऱ्यांच्या विविध समस्या आणि नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात आज दुपारी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. कृषी पशु संवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभाग मंत्रालय यांच्यामार्फत या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. कोकणातील आंबा-काजू हंगामात झालेल्या नुकसानीबाबत, शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी, बाजारपेठेतील प्रश्न तसेच व्यापाऱ्यांच्या विविध मागण्यांवर या बैठकीत सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे.
रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन मुख्यमंत्री यांच्याकडे बैठक आयोजित करण्याची मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्यानंतर मुख्यमंत्री यांनी तातडीने ही बैठक बोलावली आहे. या बैठकीत आंबा-काजू उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना दिलासा देणारे निर्णय आज दुपारी होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, कोकणातील शेतकरी व व्यापाऱ्यांचे या बैठकीकडे लक्ष लागले आहे.

















































































































































































































.jpg)




.jpg)





























































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.