पाली बेणसे (धम्मशील सावंत) - राज्यातील दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या उत्कृष्ट शिक्षकांची एक 'बँक' तयार करण्यासाठी SCERT महाराष्ट्र व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत राबविण्यात आलेल्या 'आयडॉल शिक्षक' शोधप्रक्रियेत सुधागड तालुक्यातील राज्य आदर्श शिक्षक राजेंद्र अंबिके यांची निवड झाली आहे. रायगड जिल्ह्यातील प्रथम १० शिक्षकांमध्ये स्थान मिळवत त्यांनी तालुक्याच्या शैक्षणिक वैभवात मानाचा तुरा रोवला आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील उत्तम काम करणाऱ्या, नवनवीन प्रयोग राबविणाऱ्या आणि तंत्रस्नेही शिक्षकांचा शोध घेण्यासाठी ही प्रक्रिया राबविण्यात आली होती. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवणे, शाळेचा कायापालट करणे आणि नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींचा वापर करणे या निकषांच्या आधारे अंबिके यांची ही निवड करण्यात आली आहे.
या निवडीनंतर SCERT महाराष्ट्रने आयडॉल शिक्षकांसाठी विशेष उपक्रम जाहीर केले आहेत. निवड झालेल्या शिक्षकांना विविध प्रशिक्षणे, कार्यशाळा आणि चर्चासत्रांमध्ये 'तज्ज्ञ मार्गदर्शक' म्हणून पाचारण केले जाईल. त्यांच्या यशस्वी प्रयोगांचे आणि अध्यापन पद्धतींचे चित्रीकरण करून ते राज्यभर प्रसारीत केले जाईल. शिक्षण परिषदांमध्ये या शिक्षकांच्या कामाचा प्रसार व प्रचार करून इतर शिक्षकांसाठी प्रबोधन सत्रे आयोजित केली जातील. आयडॉल शिक्षकांचा विशेष सन्मान केला जाणार असून, त्यांना सर्वोत्तम दर्जाच्या शाळांना भेटी देण्यासाठी 'अभ्यास सहलींचे' नियोजनही करण्यात येणार आहे. राजेंद्र अंबिके यांच्या या यशाबद्दल सुधागड तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यातून त्यांचे कौतुक होत आहे. त्यांच्या या निवडीमुळे ग्रामीण भागातील शिक्षकांना प्रोत्साहन मिळणार असून, गुणवत्तापूर्ण शिक्षणाची चळवळ अधिक विस्तारण्यास मदत होणार आहे.

































































































































































































.jpg)




.jpg)


























































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.