loader
Breaking News
Breaking News
Foto

सतीची भाट ग्रामस्थ मंडळ आतगाव तर्फे जिल्हास्तरीय पुरुष गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन

केळशी (मंगेश पाटील) - दापोली तालुक्यातील केळशी आतगाव भाटवाडी मध्ये सतीची भाट ग्रामस्थ मंडळाच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे बुधवार दिनांक 18/3/2026 रोजी श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली असून होळी शेजारी संतोष मनोहर पाटील यांच्या क्रीडानगरीमध्ये भव्य जिल्हास्तरीय पुरुष गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. खऱ्या अर्थाने लाल मातीत खेळला जाणारा कबड्डी हा खेळ मॅटवर न खेळवता तांबड्या मातीमध्ये खेळवला जाणार आहे. भव्य अशा प्रकारच्या कबड्डी सामन्यांचे आयोजन या सतीची भाट ग्रामस्थ मंडळांनी केलेले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीनिवास वसंत पाटील हे असून कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून नितीन भिकू दुर्गवले (जिल्हा परिषद सदस्य रत्नागिरी) तसेच संदीप दत्ताराम चिखले (पंचायत समिती सदस्य दापोली) उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम 21,001, द्वितीय क्रमांक रोख रक्कम 15,001, तृतीय क्रमांक रोख रक्कम 5,001, व चतुर्थ क्रमांक साठी रोख रक्कम 5,001 व आकर्षक चषक देऊन विजयी संघांना गौरवण्यात येणार आहे. तसेच या कबड्डी स्पर्धेसाठी सर्वोत्कृष्ट खेळाडू, सर्वोत्कृष्ट पकड आणि सर्वोत्कृष्ट चढाई प्रत्येकी रोख रक्कम 1001 व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे.

टाईम्स स्पेशल

बक्षीस वितरणाचे प्रमुख अतिथी म्हणून नामदार योगेश दादा कदम (गृहराज्यमंत्री महाराष्ट्र राज्य) तसेच उन्मेश राजे (सभापती पंचायत समिती दापोली), किशोरभाई देसाई (जिल्हा परिषद सदस्य), मकरंद म्हादलेकर (सरचिटणीस भाजपा जिल्हाध्यक्ष), राजू मोहिते (पोलीस दुरक्षेत्र आडे) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg