loader
Breaking News
Breaking News
Foto

​ऑन कॉल रक्तदाते संस्था सिंधुदुर्गला गया येथे राष्ट्रीय पुरस्कार; अमित आझाद यांच्या हस्ते गौरव

सावंतवाडी (प्रतिनिधी) : रक्तदान क्षेत्रात भारतभर आघाडीवर असणाऱ्या 'शहीद भगतसिंग युथ ब्रिगेड, गयाजी (बिहार)' या संस्थेच्या वतीने आयोजित राष्ट्रीय सोहळ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 'ऑन कॉल रक्तदाते' संस्थेला राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. बिहारमधील गया येथे झालेल्या या कार्यक्रमात देशभरातील विविध राज्यांतील १७० हून अधिक संस्थांचा गौरव करण्यात आला. ​या पुरस्कार सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद यांचे वंशज अमित आझाद यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्गचे सचिव बाबली गवंडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या कार्यक्रमात केवळ भारतातीलच नव्हे, तर शेजारील नेपाळमधील काही संस्थांनाही त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक तथा संस्थेचे अध्यक्ष दयानंद गवस यांच्या मार्गदर्शन आणि पाठिंब्यामुळे या संस्थेने जिल्ह्यात मोठे जाळे निर्माण केले आहे. स्वातंत्र्यासाठी क्रांती घडवणाऱ्या शहीद भगतसिंग यांच्या नावाने चालणाऱ्या संस्थेकडून ही राष्ट्रीय दखल घेतली गेल्याने सिंधुदुर्गच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. ​या यशाबद्दल बोलताना अध्यक्ष दयानंद गवस म्हणाले की, "संस्थेच्या कार्यासाठी रात्रंदिवस धडपड करणाऱ्या कार्यकर्त्यांचे हे यश आहे. आम्ही हा सत्कार जिल्ह्यातील सर्व रक्तदात्यांना समर्पित करतो." ​संस्थेला हा राष्ट्रीय बहुमान मिळाल्याबद्दल विविध सामाजिक संस्था आणि हितचिंतकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg