loader
Breaking News
Breaking News
Foto

देवबाग बसफेरी अचानक रद्द केल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त

मालवण (प्रतिनिधी) - मालवण आगारातून देवबागकडे जाणारी बस प्रवासी कमी असल्याच्या कारणावरून रविवारी दुपारी अचानक रद्द करण्याची घोषणा मालवण आगारामार्फत करण्यात आल्याने बसची वाट पाहत बसलेल्या देवबाग येथील प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. याची माहिती थेट ठाकरे शिवसेना कार्यालयात प्रवासी वर्गाने दिली. यावेळी कार्यालयात उपस्थित असलेले शहरप्रमुख बाबी जोगी, नगरसेवक तपस्वी मयेकर व सिद्धेश मांजरेकर यांनी तात्काळ प्रवाशांसह डेपो कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना खड्या शब्दांत समज दिली. प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे सांगत त्यांनी अचानक बस रद्द केल्याबाबत डेपो अधिकाऱ्यांना जाब विचारला. पदाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर अखेर रद्द करण्यात आलेली देवबाग बस फेरी पुन्हा सुरू करण्यात आली. त्यामुळे बसची वाट पाहत असलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. यावेळी देवबाग येथील प्रवाशांनी ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

ठाकरे शिवसेना पदाधिकऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर बसफेरी पूर्ववत

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg