loader
Breaking News
Breaking News
Foto

भारतीय जनता पार्टी खेड शहर व खेड तालुका यांच्यावतीने राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

खेड (प्रतिनिधी )-- १२ मार्च २०२६ रोजी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्पीय बजेट चालू असताना मकर प्रवेशद्वाराच्या बाहेर काँग्रेस नेते खा. राहुल गांधी काँग्रेस तसेच अन्य विरोधी 20 खासदारांनी चहा बिस्कीट बरोबर "चहा पार्टी" आयोजित करणे ही अत्यंत खेदजनक व आक्षेपार्ह बाब आहे. संसद ही आपल्या देशाची सर्वोच्च लोकतंत्र संस्था आहे, त्याची प्रतिष्ठा व मर्यादा राखणे ती प्रत्येक लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. परंतु या घटनेच्या माध्यमातून संसद परिसरात एक प्रकारे 'पार्लमेंट पिकनिक स्पॉट' बनविण्याचा विरोधकांकडून प्रयत्न करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याच अनुषंगाने आज भारतीय जनता पार्टी खेड शहर व खेड तालुका यांच्यावतीने राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनाला भारतीय जनता पार्टीचे खेड शहराध्यक्ष भालचंद्र नंदू साळवी व भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे यांनी प्रमुख नेतृत्व केले. या आंदोलनावेळी भारतीय जनता पार्टी गटनेते रहीम सहिबोले , नगरसेविका सौ. वैभवी वैभव खेडेकर, युवा मोर्चा सरचिटणीस. मिलिंद (दादू) नांदगावकर , नगरसेविका सौ. आशाताई सनगरे, राहुल पाटणे, सिद्धेश पाटणे , शशांक सिनकर , विशाल होळकर, बाळू वर्मा, विजय गुप्ता ,सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार यांच्यासह भाजपचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg