loader
Breaking News
Breaking News
Foto

सर्वसामान्यांच्या तक्रारी सोडवण्यास महसूल विभाग कटिबद्ध - डॉ. विजय सूर्यवंशी

संगलट खेड (इक्बाल जमादार) - महसूल व विविध प्रशासकीय यंत्रणांशी संबंधित समाजातील सर्व स्तरातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी महसूल विभाग कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन दापोलीचे उपविभागीय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शेनाळे येथे केले. १४ मार्च २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्र.१ चे अंर्तगत जिल्हा परिषद मॉडेल स्कूल शेनाळे येथे महाप्रळ महसूल मंडळाचे शिबिर १४ मार्च २०२६. रोजी आयोजित करण्यात आले होते. या निमित्ताने आयोजित स्वागत व दाखले वाटप कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना ते बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले, महसूल मंत्र्यांच्या शेनाळे येथे महाराजस्व समाधान शिबिर अभियानात २८३ दाखल्यांचे वितरण करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संकल्पनेतून प्रशासन सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोहचवण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींचे सहकार्याने शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न महसूल विभाग या मोहिमेत करीत आहे. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी महसूल विभाग २४ तास तत्पर असून नागरिकांनी शिबिराचा लाभ घेऊन आपले प्रश्न सोडवून आवश्यक दाखले लगेच प्राप्त करुन घ्यावेत. या कार्यक्रमास तहसीलदार अक्षय ढाकणे, जिल्हा परिषद सदस्य प्रताप घोसाळकर, अस्मिता केंद्रे, पंचायत समिती सदस्य अनिल रटाटे, तालुका कृषि अधिकारी सोमनाथ अहिरकर, मंडणगड पंचायत समितीचे वामन मेंढे, वनविभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग, महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

या कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व दाखल्यांचे वितरण करण्यात आले. शिबिरात नागरिकांच्या मागणीनुसार विहीत नमुन्यात प्राप्त झालेल्या परिपूर्ण प्रस्तावांची एकूण २०८ इतकी प्रमाणपत्रे नागरीकांना लगेचच वितरीत करण्यात आली. यात उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्रे, जातीचे प्रमाणपत्रे, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती, नवीन शिधापत्रिका, संजय गांधी निराधार अनुदान वाटप याचबरोबर महसुल विभागाशी संबंधीत फेरफारांच्या नोंदी दुरुस्ती, १४५ डिजिटल सातबारे, ७८, ८ आठ अ उपलब्ध करुन देण्यात आले. एक खिडकी योजनेअंर्तगत ४४ अर्ज निकाली काढण्यात आले. शिबिर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महसूल व सर्व यंत्रणांचे अधिकारी कर्मचारी तसेच महाप्रल लोकप्रिय मंडळ अधिकारी चौगुले पोलीस पाटील यांनी मेहनत घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg