loader
Breaking News
Breaking News
Foto

केळशी आतगावात गुढीपाडव्यानिमित्त छोट्या पालख्यांचे घरोघरी आगमन

केळशी (मंगेश पाटील) - दापोली तालुक्यातील केळशी, आतगाव परिसरात लहान मुलांकडून शिमगोत्सवातील पालखी परंपरा जपली जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. लहान मुले मोठ्यांच्या पावलावर पाऊल ठेवत ग्राम देवतेची सेवा करत आहेत. मुले देवीची पालखी घरोघरी नेत असून गावातील लोक मनोभावे पूजा करून जीवनाच्या सुख-समृद्धीसाठी देवतेकडे साकडे घालत आहेत. मोठी माणसे ग्रामदेवतेची सेवा कशा प्रकारे करतात? याकडे बारीक लक्ष ठेवून मुले घरोघरी पालखी नेण्याची परंपरा चालवत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आज गुढीपाडव्याच्या दिवशी साखरी (मंडणगड), उंबरशेत, रोवले, मांदिवली बाईतवाडी येथील मुलांनी एकत्रित येऊन ग्रामदेवतेची छोट्या पालखीत देवीची प्रतीकात्मक मूर्ती ठेवून केळशी, आतगाव गावातील प्रत्येक घरात पालखी नेली. गावातील महिलांनी देवीची ओटी भरून देवतेचे दर्शन घेतले तसेच मुलांचे कौतुकही केले. सनई, ढोल-ताशांच्या गजरात मुले नाचत, देवीची पालखी नाचवत घरोघरी नेत असतात. मोठे झाल्यावर ग्रामदेवतेची सेवा करण्यात आपल्याकडून काही कमी पडणार नाही, याची हमी ही लहान मुले देत आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg