loader
Breaking News
Breaking News
Foto

दि.१८ मार्च रोजी गुहागर वरचापाट येथील श्री भैरी व्याघ्यांबरी देवीचा समा महोत्सव

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर वरचापाट ग्रामस्थांच्या वतीने श्री भैरी व्याघ्यांबरी देवीचा समा महोत्सव बुधवार दिनांक १८ मार्च रोजी गुहागर वरचा पाट येथील पद्माकर महादेव भोसले (खोत) यांच्या अंगणामध्ये पार पडणार आहे. रात्री ७ वाजता उपस्थित गावांचे लॉटरी पद्धतीने नंबर काढले जाणार असून सायंकाळी ७.३० ते ९ या वेळेत पालखी नाचवली जाणार आहे. रात्री १०.३० वा. नंतर मुख्य लोटण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. लोटण्या संपल्यानंतर महाप्रसाद होवून कार्यक्रमाची सांगता होणार आहे. समा महोत्सव आजही मोठ्या भक्ती भावाने गुहागर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पार पडतो. कोकणातील गावागावांमध्ये देवीला गा-हाणे घालण्याचा आणि मर्दाणी खेळ पालखीबरोबर लोटण्या घेण्याचा हा शिमगोत्सवामध्ये मुख्य आकर्षण असतो. महाराष्ट्रात पाण्याचा रंग बदलला, मातीचा रंग बदलला की तेथील सणांच्या परंपरा बदलतात, उत्सव बदलात. गुहागर तालुक्यामध्ये होणारा समा (लोटणी) उत्सवाची शेकडो वर्षाची परंपरा वर्षानुवर्षे कायम आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आजही वर्षभरात चार ते पाच गावांमध्ये हा उत्सव पारंपरिकरित्या देवीची पालखी घराघरात फिरू लागल्यानंतर ग्रामदेवीच्या साक्षीने पालखीसमोर हा उत्सव साजरा केला जातो. यामध्ये प्रामुख्याने भंडारी समाजाला उत्सवाबद्दलची मोठी उत्सुकता असते. भंडारी समाजाने १८९० साली सुरू कलेला हा उत्सव म्हणजेच पालखीबरोबर लोटण्या घेण्याचा प्रकार श्रद्धेने भारलेला असतो. तरीही चित्तथरारक, आव्हानात्मक अंगावर शहारे आणणारा हा प्रकार आहे. साधारणतः १८९० पासून या उपक्रमाला सुरूवात झाली असल्याचे जुने जाणते लोक सांगतात. मध्यंतरीच्या काळामध्ये हा उपक्रम अतिशय गरिबीचे दिवस असताना भंडारी समाजातील ज्ञातीबांधवांनी संमजसपणे चालवला. समा याचा खरा अर्थ समाजासाठी समानता आणणारा उत्सव, समाजाला एकत्र आणण्यासाठी सुरू झालेली परंपरा आजही सुरू आहे. प्रामुख्याने भंडारी समाज ज्या भागामध्ये आहे त्याठिकाणी समा उत्सव साजरा केला जातो आणि येथील तरूण आपली शक्ती पणाला लावत या देव नसलेल्या पालखी बरोबर लोटण्या घेतात.

टाईम्स स्पेशल

समाज या भावनेतून समाजाने मान्य केलेल्या उपक्रमात सहभागी होतात. या उत्सवामध्ये कुणबी, तेली, खारवी समाजही आपापल्या ठिकाणी समा उत्सवाचे आयोजन करतो. देवीच्या पालखी प्रमाणे असणाऱ्या लाकडी उपड्या देव नसलेल्या पालखीत दोन्ही बाजूंनी लोटण्याची स्पर्धा होते. कोणी एक गांव समा उत्सवाचे आयोजन करून इतर गावांना निमंत्रीत करतो. या गावाशी सर्व गावातील तरूण लोटणी घेतात. यामध्ये प्रथम लोटणी घेणाऱ्याला भवानीचा मान म्हणतात. हा उत्सव पहाटेपर्यंत भक्तीभावात पार पडतो. शेवटी समा महोत्सवासाठी आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसाद दिला जातो. या उत्सवामध्ये एकत्रितरित्या समाज आल्याने वाद होत नाहीत. बदलत्या काळात देखील समा महोत्सव आजही सर्व लहानथोर मंडळी श्रद्धेने साजरा करत असतात. तरी या उत्सवासाठी सर्व समा महोत्सव प्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन गुहागर वरचा पाट येथील खोत पद्माकर भोसले यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg