संगलट खेड (प्रतिनिधी) - दापोली ते हर्णे या मुख्य महामार्गावर, कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ एक धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे. एकेकाळी गॅस शेगडीवर चालणार्या हातगाडीवरील हॉटेल व्यवसायिकांना आता व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे घरघर लागली आहे. पर्याय नसल्याने येथील व्यावसायिक चक्क रस्त्याच्या कडेला चूल मांडून पदार्थ तयार करताना दिसत आहेत.
कोकण कृषी विद्यापीठाचे गेट हे विद्यार्थ्यांची आणि प्रवाशांची मोठी वर्दळ असलेले ठिकाण आहे. या ठिकाणी असलेल्या एका हातगाडीवर दररोज अनेक नागरिक नाश्ता पदार्थांचा आस्वाद घेतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या उपलब्धतेत अडचणी निर्माण झाल्या आहेत. गॅसअभावी व्यवसाय बंद ठेवण्यापेक्षा या कष्टाळू व्यावसायिकाने लाकडाच्या चुलीचा आधार घेतला आहे.
गॅस सिलेंडर वेळेवर मिळत नसल्याने आणि किमती परवडत नसल्याने आम्हाला हा मार्ग निवडावा लागला आहे, असे मत येथील व्यावसायिकांनी व्यक्त केले. प्रशासनाने किंवा संबंधित गॅस एजन्सीने व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा सुरळीत करावा, जेणेकरून छोट्या व्यावसायिकांना सन्मानाने आपला उदरनिर्वाह करता येईल, अशी मागणी आता जोर धरत आहे. या चित्रामुळे आजच्या काळातही सर्वसामान्यांना आपला व्यवसाय टिकून ठेवण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.














































































































































































































































































.jpg)




.jpg)









































































































































.jpg)


























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.