loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमध्ये एस.टी. चालकाला बेदम मारहाण, दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

खेड (प्रतिनिधी)- खेड शहरात एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एस.टीच्या हेडलाईटच्या 'अपर-डिपर' देण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून थेट मारहाणीपर्यंत प्रकार पोहोचला असून, एका एस.टी. बस चालकाला भररस्त्यात अडवून बेदम मारहाण करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शरद महादेव माने (वय ४२, रा. वाळवा, जि. सांगली) हे राज्य परिवहन महामंडळाच्या रोहा आगारात चालक-वाहक म्हणून कार्यरत आहेत. सोमवार, दि. १६ मार्च २०२६ रोजी पहाटे सुमारे २ वाजण्याच्या सुमारास ते आपली एस.टी. बस (क्र. MH 14 KQ 3970) घेऊन चिपळूणहून खेडच्या दिशेने येत होते. दरम्यान, खेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या पाठीमागील रस्त्यावर समोरून येणाऱ्या टोयोटा इनोव्हा क्रिस्टा (क्र. MH 46 AU 3717) या कारच्या चालकाने बसकडे प्रखर हेडलाईट टाकले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यामुळे दृष्टीस अडथळा निर्माण झाल्याने चालक माने यांनी समोरच्या वाहनाला 'अपर-डिपर' देत लाईट कमी करण्याचा इशारा दिला. मात्र, कार चालकाने हा इशारा दुर्लक्षित केला. यानंतर हा वाद चिघळला. माने यांनी बस सावधपणे खेड बस स्थानकाकडे वळवण्याचा प्रयत्न केला असता, संबंधित कार चालकाने आपली गाडी बससमोर आडवी लावून रस्ता अडवला. गाडीतून उतरलेल्या सनी संजय नलावडे आणि कौस्तुभ पाटणे (दोघेही रा. खेड) यांनी बसच्या चालकाच्या केबिनचा दरवाजा उघडून माने यांना जबरदस्तीने खाली ओढले. त्यानंतर कोणतेही ठोस कारण नसताना दोघांनी माने यांना हाताने व चापट्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत माने खाली पडल्याने त्यांच्या उजव्या डोळ्याला तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला.

टाइम्स स्पेशल

दरम्यान, मारहाण केल्यानंतर कौस्तुभ पाटणे हा गर्दीचा फायदा घेत घटनास्थळावरून फरार झाला. या प्रकरणी जखमी चालक शरद माने यांनी खेड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत दोन्ही संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत कलम १३२, ३५२, ११५(२) गति ३(५) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ५७/२०२६ नुसार दाखल केल. सध्या पोलिसांकडून संशयित आरोपींचा शोध सुरू असून, या प्रकरणाचा ७.. तपास सुरू आहे. या घटनेमुळे "रोड रेज"च्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली जात असून, सार्वजनिक सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg