दापोली - दापोली शहरातील नर्सरी रोडवरील जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या सार्वजनिक गणपती विसर्जन तलावाची सध्या मोठी दुरवस्था झाली आहे. तलावाची संरक्षक भिंत कोसळल्याने सर्व दगड तलावात पडले असून, पाण्याला दुर्गंधी येत आहे. येत्या काही महिन्यांत पावसाळा सुरू होणार असून त्यापूर्वाच या तलावाची डागडुजी करणे अत्यंत गरजेचे आहे. स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, या तलावाकडे प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. आम्ही दरवर्षी येथे गणपती विसर्जन करतो, पण आताची स्थिती पाहता येथे विसर्जन करणे कठीण झाले आहे, असे स्थानिक रहिवाशांनी सांगितले.
पावसाळ्यापूर्वी हा तलाव स्वच्छ आणि सुंदर करण्यात यावा, अशी इच्छा दापोलीकरांनी व्यक्त केली आहे. तलावाच्या तळाशी साचलेला कचरा आणि गाळ यंत्राव्दारे बाहेर काढणे, कोसळलेला भाग पुन्हा बांधून काढणे जेणेकरून माती तलावात वाहून येणार नाही, साचलेले पाणी उपसून नवीन पाण्याचे स्त्रोत मोकळे करणे, तलावाच्या बाजूला रॅलिंग बसवणे जेणेकरून अपघात टळतील अशी कामे येथे होणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले आहे.
































































































































































































































































.jpg)




.jpg)









































































































































.jpg)


























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.