दापोली (चंद्रशेखर जोशी) : जेसीआय दापोलीच्या अबोली वीक-२०२६ अंतर्गत हॉटेल स्वाद मराठी येथे आयोजित करण्यात आलेल्या दापोली खाद्यसम्राज्ञी २०२६ या पाककला स्पर्धेला महिला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत एकूण २७ स्पर्धकांनी सहभाग घेत आपल्या उत्कृष्ट पाककौशल्याचे सादरीकरण केले. स्पर्धेत विविध चविष्ट पदार्थ सादर करण्यात आले. परीक्षकांनी चव, सादरीकरण आणि नावीन्य यावर आधारित गुणांकन करून विजेत्यांची निवड केली. विजेते स्पर्धक - प्रथम क्रमांक: सौ. वैष्णवी कदम, द्वितीय क्रमांक: सौ. मनीषा रेवाळे, तृतीय क्रमांक: सौ. स्वाती पालकर, उत्तेजनार्थ पारितोषिक सौ. धनश्री पाटोळे व सौ. श्रावणी सैतवडेकर. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रोजेक्ट डायरेक्टर महेंद्र खैरे, प्रोजेक्ट को-ऑर्डिनेटर अनिकेत खानविलकर आणि व्हीपी मॅनेजमेंट तेजस मेहता यांनी जेसीआय सदस्यांच्या सहकार्याने उत्कृष्ट नियोजन व समन्वय साधला. जेसीआय दापोलीतर्फे सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचेही आभार मानण्यात आले. यावेळी डॉ. कुणाल मेहता (अध्यक्ष), रोशन वेदक (सचिव) यांचेसह सर्व पदाधिकारी व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टाइम्स स्पेशल
कोकणच्या पर्यटनाला मिळणार गती: जयगड खाडीवर ७५० कोटींचा भव्य सागरी पूल साकारणार










































































































































































































































































.jpg)




.jpg)









































































































































.jpg)


























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.