loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवसेना अल्पसंख्याक सेल लांजा आयोजित दावत ए इफ्तार कार्यक्रम उत्साहात

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - रमजान महिन्याच्या पवित्र वातावरणात सामाजिक सलोखा आणि बंधुभाव वाढवण्याच्या उद्देशाने शिवसेना अल्पसंख्याक सेल, लांजा तालुका यांच्या वतीने आयोजित दावत ए इफ्तार कार्यक्रम लांजा शहरात अत्यंत उत्साहात पार पडला. सदर कार्यक्रम लांजा शहरातील जामा मशीद शेजारी आयोजित करण्यात आला होता. या इफ्तार मेळाव्याला विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक अण्णा सामंत उपस्थित होते. तर यावेळी युवानेत्या अपूर्वा सामंतही उपस्थित होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी सामाजिक कार्यकर्ते महंमद रखांगी, जमातुल मुस्लिमीन लांजाचे अध्यक्ष शौकत नाईक, लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम, गटविकास अधिकारी हिंदुराव गिरी, शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनिल (राजू) कुरूप, तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये, नगराध्यक्षा सावली कुरूप, पंचायत समिती सभापती मानसी आंबेकर, उपनगराध्यक्ष मिलिंद लांजेकर, नगरसेवक रफिक (गुल्ल्या) नेवरेकर तसेच उद्योजक गनी मुलाणी, असीम मुलाणी, हनिफ नाईक सामाजिक कार्यकर्ते हुसेन नेवरेकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी इफ्तार कार्यक्रमात उपस्थित लावली.

टाइम्स स्पेशल

दावत-ए-इफ्तारच्या निमित्ताने सर्वधर्मीय नागरिक एकत्र येऊन उपवास सोडत असल्याचे चित्र कार्यक्रमावेळी पाहायला मिळाले. याप्रसंगी बोलताना उद्योजक आण्णा सामंत, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम व महंमद रखांगी यांनी समाजातील ऐक्य, बंधुभाव आणि परस्पर सहकार्याची भावना अधिक दृढ झाल्याचे सांगत आयोजकांचे कौतुक केले. या कार्यक्रमाला मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg