संगलट खेड (इक्बाल जमादार) - उन्हाळ्याचे आगमन होताच हा रानातील रानमेवा खेड बाजारात आल्याने यामध्ये करवंदे, कैरी, अंजीर, काजू, चिंच, अदि जंगलामध्ये तयार झालेला रानमेवा बाजारात दाखल झाला आहे. या रानमेवामुळे आदिवासी या समाज्याला रोजगार मिळत असतो. तसेच रानातील काळी मैना अजून तयार झाली नसून हिरवीगार करवंदे म्हणून हिचा ठेचा म्हणून स्वयंपाक करण्यासाठी दैनंदिन जीवनात उपयोग होत आल्याचे महिला वर्गाकडून सांगण्यात येत आहे. रुचकर, स्वस्त आणि औषधी असे बहुउपयोगी असलेल्या या रानमेव्याची अनेकांनी भुरळ पडत आहे. दुर्गम भागात राहणारे अदिवासी बांधवांचे उत्पन्नाचे साधन म्हणून डोंगरातील रानमेवा असून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पटकन तोंडात टाकता येणारा तसेच शरीराला आणि मनाला गारवा देणाऱ्या या रानमेव्याला अधिक मागणी दिसत आहे.
उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीराला थंडावा निर्माण होण्यासाठी फलाहार केला जातो. बाजारपेठेमध्ये आंबा, द्राक्षे, फणस, चिकू यासारख्या फळांचा बरोबरच करवंद, काजुफळ, तोरणे, यासारख्या रानमेव्याची विक्री होते. हिवाळा सपल्यानंतर प्रत्येकाला वेध लागतात ते रानमेव्याचे. झाडांना नवीन पालवी फुटू लागल्यानंतर रानात करवंदे, आंबे, काजू, फणस, चिकू यासह अन्य ऋतूनुसार येणारी फळे ही आता बाजारात आदिवासी बांधवांच्या माध्यमातून विक्रीसाठी येऊ लागली. अनेक ठिकाणी टोपली भरून बसलेली नजरेस पडत असल्याने या रानमेवामुळे आदिवासी कुटुंबाला उदरनिर्वाहाचा साधन मिळत असते व खाव्यांची सोय होते. त्यामुळे ऋतूनुसार पिकणारी फळे खाण्याची पर्वणी मिळते. या रानमेव्याची खवये वाट पाहात असतात.
उन्हामध्ये अगदी पटकन तोंडात टाकता येणाऱ्या आणि खायला रुचकर असणाऱ्या या रानमेव्यांना लहान मुलांपासून मोठ्या मंडळीं सर्वाचीच मागणी असते. शरीराला थंडावा देणारा आणि औषधी गुणधर्म असणारा रानमेवा अगदी आवडीने खाताना दिसतात.

































































































































































































.jpg)




.jpg)


























































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.