loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीत राष्ट्रीय लोक अदालतमध्ये प्रलंबित दिवाणी, फौजदारी व वादपूर्व १५९ प्रकरणे निकाली

सावंतवाडी (प्रतिनिधी) - सावंतवाडी तालुका विधी सेवा समिती आणि सावंतवाडी तालुका वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी न्यायालयात आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये प्रलंबित दिवाणी, फौजदारी व वादपूर्व अशी १५९ प्रकरणे सामंजस्याने व तडजोडीने निकाली काढण्यात आली. यातून एकूण २७ लाख ९५० एवढी रक्कम वसूल झाली आहे. राष्ट्रीय लोक अदालतीचा शुभारंभ तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश सौ.जे.एम. मिस्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी वकील संघटनेचे तालुका अध्यक्ष ऍड. बी.बी. रणशूर सरकारी सहाय्यक अभियंता गणेश पाटोळे, पॅनल सदस्य ऍड. एस.जे.सावंत, वकील, पक्षकार, न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते. लोक अदालतमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली दिवाणी व फौजदारी अशी २३९ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यातील ४३ प्रकरणे सामंजस्याने व तडजोडीने निकाली झाली यातून ११ लाख ४१ हजार २५० रुपये एवढी रक्कम वसुली झाली आहे. तसेच लोक अदालतमध्ये बँका, ग्रामपंचायत,वीज वितरण,पतसंस्था, दूरसंचार विभाग अशी ११३९ वादपूर्व ठेवण्यात आली होती. त्यातील ११६ प्रकरणे तडजोडीने निकाली झाली आहेत. त्यातील १५ लाख ५९ हजार ७०० रुपये एवढी रक्कम वसुली झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg