loader
Breaking News
Breaking News
Foto

रमेश जोशी यांचा विशेष सन्मान

दापोली - डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या निवृत्त मेळाव्याचे आयोजन सर विश्वेश्वरैय्या सभागृह दापोली येथे करण्यात आले होते. यावेळी जालगांव श्रीरामनगर येथील रमेश जोशी वय 81 यांचा विशेष सन्मान त्यांच्या कार्याप्रति ऋण व्यक्त करण्याकरिता माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर आणि विद्यमान कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी संशोधन संचालक डॉ. डुंबरे यांच्यासह माजी शिक्षण संचालक, निवृत्त अधिकारी आणि कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जोशी यांची वयाच्या 81 व्या वर्षा काम करण्याची पध्दत आणि उत्साह हा नव्या पिढीला लाजवेल आणि प्रेरणादायी ठरेल असाच आहे. जोशी यांच्या या सन्मानानंतर त्यांच्या हितचिंतकांनी आनंद व्यक्त करून, आमच्या सच्चा निर्मळ मनाच्या सद्भावनाशील, सदाचारी, मितभाषी आणि सदा कार्यमग्न असणाऱ्या कृषिमित्र जोशी अण्णांवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg