loader
Breaking News
Breaking News
Foto

शिमगोत्सवानिमित्त मुंढरमध्ये पालखी नृत्याचा रंगतदार सोहळा

आबलोली (संदेश कदम) - गुहागर तालुक्यातील मुंढर गावातील ओळवणवाडी येथे शिमगोत्सवाच्या निमित्ताने पारंपरिक पालखी नृत्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालखी नृत्याचा रंगतदार सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून पारंपरिक संस्कृतीचा देखणा अविष्कार या ठिकाणी पाहायला मिळाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सोहळ्यास गुहागर पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती प्रणव पोळेकर, पंचायत समिती सदस्य गौरव वेल्हाळ आणि मंगेश जोशी उपस्थित होते. यावेळी पारंपरिक पालखी नृत्यासोबत विविध देखावेही सादर करण्यात आले. रंगीबेरंगी वेशभूषा, ढोल-ताशांच्या गजरात सादर करण्यात आलेले पालखी नृत्य आणि सामाजिक-पौराणिक विषयांवरील देखावे यामुळे उपस्थित ग्रामस्थांना उत्सवाचा आनंद लुटता आला. कोकणात शिमगोत्सवाच्या काळात ग्रामीण भागात अशा प्रकारच्या पालखी नृत्य स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या परंपरेमुळे स्थानिक कला, संस्कृती आणि लोकपरंपरा जपल्या जात असून नव्या पिढीला या संस्कृतीची ओळख होत असल्याचे मत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg