loader
Breaking News
Breaking News
Foto

मार्लेश्वरचा कायापालट! ४० कोटींचा विकास आराखडा; आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्याला यश

संगमेश्वर (प्रतिनिधी) - कोकणातील प्रति-काशी म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्री क्षेत्र मार्लेश्वर तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार शेखर निकम यांनी शासनस्तरावरून सुमारे ४० कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर करून घेतला आहे. यातील पहिल्या टप्प्यातील १० कोटी रुपयांच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात झाली असून, पुढील ३० कोटींच्या कामांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. यामुळे येत्या काळात मार्लेश्वर हे राज्यातील एक अतिशय आकर्षक आणि सोयीसुविधायुक्त पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सध्या सुरू असलेल्या १० कोटींच्या निधीतून भाविकांच्या मूलभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे. १ कोटी ८७ लाखांची कामे: मार्लेश्वर मंदिर परिसरातील पाखाड्या बांधणे, ५०० मीटरचा पालखी मार्ग (नारळ ते मारलेश्वर) सुधारणे, पोलीस चौकी आणि तात्पुरते आरोग्य केंद्र उभारणे. धबधब्याकडे जाणार्‍या नदीवर ३० मीटर लांबीचा नवा पूल उभारण्यासाठी ३ कोटींचा निधी खर्च होत आहे. मंदिर परिसरातील सभामंडप आणि दत्त मंदिर परिसराचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. उर्वरित ५ कोटींतून प्रशस्त पार्किंग, सुसज्ज विक्री स्टॉल, व्ह्यूइंग गॅलरी, कॉंक्रिटच्या पाखाड्या आणि दोन भक्कम संरक्षण भिंतींचे काम केले जात आहे.

टाइम्स स्पेशल

आमदार शेखर निकम यांनी मार्लेश्वरच्या पुढील विकासासाठी ३० कोटी रुपयांचा नवीन आराखडा तयार केला असून, त्यासाठी विशेष सल्लागाराची नेमणूकही करण्यात आली आहे. या प्रस्तावात महत्त्वाकांक्षी बदलांचा समावेश आहे. सुमारे ९०० मीटर लांबीच्या पायरी मार्गाचे रुंदीकरण करून तो अधिक सुटसुटीत केला जाईल. वृद्ध आणि दिव्यांग भाविकांसाठी ’रोपवे’ उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून, त्यावर गांभीर्याने काम सुरू आहे. सध्या असलेल्या ५० हून अधिक कच्च्या दुकानांचे रूपांतर कायमस्वरूपी गाळ्यांमध्ये करून स्थानिक व्यावसायिकांना आधार दिला जाणार आहे. दर्शन रांगेत ५ सुसज्ज टॉयलेट्स आणि पावसापासून संरक्षणासाठी मंडप दुरुस्ती केली जाणार आहे. मार्लेश्वर हे केवळ श्रद्धास्थान नसून निसर्गपर्यटनाचे मोठे केंद्र आहे. येथील भक्त आणि पर्यटकांची संख्या पाहता, त्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात हाच आमचा मानस आहे. १० कोटींची कामे वेगाने सुरू असून ३० कोटींच्या दुसर्‍या टप्प्यामुळे मार्लेश्वरचा चेहरामोहरा बदलेल, असे आमदार शेखर निकम यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

१० कोटींची कामे प्रगतीपथावर; ३० कोटींच्या दुसर्‍या टप्प्याचा प्रस्ताव शासनाकडे

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg