सावंतवाडी (प्रतिनिधी) - निसर्गाच्या किमया अगाध असतात, याचाच प्रत्यय सावंतवाडी तालुक्यातील वेर्ले गावात आला आहे. येथील एका फणसाच्या झाडाला चक्क केळीचा घड आल्याची दुर्मिळ घटना घडली असून, हा 'चमत्कार' पाहण्यासाठी परिसरात मोठी गर्दी होत आहे. वेर्ले-फौजदारवाडी येथील रहिवासी विश्राम पुंडलिक लिंगवत यांच्या घराशेजारी फणसाचे एक मोठे झाड आहे. सध्या फणसाचा मोसम असल्याने या झाडाला ठिकठिकाणी फणस लागले आहेत. मात्र, जमिनीपासून साधारण १० ते १५ फूट उंचीवर असलेल्या एका फणसाच्या देठातून अचानक केळीचा घड बाहेर आल्याचे दिसून आले. फणसाच्याच झाडावर केळीचा फणा पाहून खुद्द घरमालकही अवाक झाले. एकाच झाडावर दोन भिन्न प्रजातींची फळे लागणे ही अत्यंत दुर्मिळ आणि नैसर्गिक आश्चर्याची बाब मानली जात आहे. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच वेर्ले परिसरातील नागरिकांनी हा प्रकार पाहण्यासाठी लिंगवत यांच्या बागेत गर्दी केली आहे. वनस्पतिशास्त्राच्या दृष्टीने ही घटना नेमकी कशामुळे घडली, याबाबत आता चर्चा रंगू लागली आहे. सध्या हा 'फणसावरील केळीचा घड' संपूर्ण तालुक्यात कुतूहलाचा आणि चर्चेचा विषय ठरला आहे.
टाइम्स स्पेशल
कोकणच्या काजूची आता थेट जागतिक झेप!
























































































































































































































.jpg)




.jpg)








































































































































.jpg)


























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.