संगलट (खेड) (इक्बाल जमादार) - भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या मान्यतेने मध्यप्रदेश हौशी कबड्डी असोसिएशनच्या वतीने दि.१९ ते २२ मार्च २०२६ या कालावधीत ५ वा फेडरेशन कप वरिष्ठ पुरुष / महिला गट कबड्डी स्पर्धा श्री.नरेंद्रदास मोदी स्टेडीयम सटना, मध्यप्रदेश येथे होणार असून असून महाराष्ट राज्य संघाचे सराव शिबीर सुवर्णा संतोष केणे गार्डन, डोंबिवली पूर्व ठाणे येथे संपन्न झाले. सराव शिबिरातुन महाराष्ट राज्याचा अंतिम संघ निवडण्यात आला असून महिला अंतिम संघात अनिकेत स्पोर्ट्स क्लबच्या आघाडीच्या खेळाडू समरीन बुरोंडकर, तस्नीम बुरोंडकर यांची निवड झाली आहे. तसेच समरीन बुरोंडकर हिची महाराष्ट्र महिला संघाच्या कर्णधार पदी निवड झाली आहे.
समरीन बुरोंडकर, तस्नीम बुरोंडकर तसेच अनिकेत स्पोर्ट्स क्लबचे पदाधिकारी, प्रशिक्षक यांचे यशाबद्दल उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य तसेच रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन अध्यक्ष नाम.उदय सामंत रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन उपाध्यक्ष तसेच खेड तालुका कबड्डी असोसिएशन लोकप्रिय अध्यक्ष व खेड नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष सतिश चिकणे, खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष महेश भोसले, उपाध्यक्ष भाई हंबीर, सुभाष आंबेडे, सचिव रविंद्र बैकर, सहसचिव शरद भोसले, खजिनदार दाजी राजगुरू, अॅड. संदेश चिकणे, दिलीप कारेकर, दीपक यादव, तेजा बैकर, संपदा गुजराथी, सुजित फागे, स्वप्नील सैतवडेकर, महेश मर्चंडे, संतोष शिर्के, विलास बेंद्रे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




























































































































































































































.jpg)




.jpg)








































































































































.jpg)


























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.