loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीच्या मृदुला मोरेला राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत 14 वे रँकिंग

रत्नागिरी : उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे पार पडलेल्या चौथ्या राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत रत्नागिरीची सुकन्या मृदुला संजीवनी साईप्रसाद मोरे हिने कंपाउंड प्रकारात आपल्या अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करत देशात १४ वे रँकिंग पटकावले आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेत तिने थेट आंतरराष्ट्रीय कीर्तीची धनुर्धर आणि अर्जुन पुरस्कार विजेती शीतलदेवी हिच्याशी दोन हात करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच मृदुलाने अत्यंत आत्मविश्वासाने आणि अचूकपणे बाण सोडत पहिल्या फेरीत आपला दबदबा निर्माण केला होता. पहिल्या राऊंडमधील तिच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे दुसऱ्या राऊंडमध्ये तिचा सामना दिग्गज खेळाडू शीतलदेवीशी झाला. बलाढ्य प्रतिस्पर्धी समोर असतानाही डगमगून न जाता मृदुलाने दिलेली झुंज कौतुकास्पद ठरली. तिच्या या जिद्दीमुळेच तिने राष्ट्रीय पातळीवर १४ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. ​मुळची रत्नागिरीची असलेल्या मृदुलाला सातारा येथील 'दृष्टी आर्चरी अकॅडमी'चे प्रसिद्ध प्रशिक्षक प्रवीण सावंत आणि सायली सावंत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मृदुलाने आपले कौशल्य घासून पुसून तयार केले असून, तिच्या या यशाने रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या घवघवीत यशानंतर मृदुलावर सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत असून, तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg