loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाणे शहरात चोरटे सक्रिय; कार्यालय फोडून मोबाईल, पीसी व लॅपटॉपची चोरी

ठाणे (प्रतिनिधी) - ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शहरात विविध भागात रेल्वे स्थानकावर रेल्वे लोकलमध्ये आणि बस स्टॉपवर चोरट्यांचा सुळसुळाट झाल्याचे अनेक घटनांवरून स्पष्ट होत आहे. ठाणे रेल्वे स्थानकावर रोजच प्रवाशांच्या मोबाईलवर दबा धरून बसलेले मोबाईल चोरटे हातसफाई करून लाखो रुपयांचे मोबाईल लांबून असतानाच याच भुरट्या चोरांच्या कारवायांमुळे शहरातील कार्यालय, घर फोडून किमती वस्तू आणि मोबाईल लांबविण्याचे प्रकार वाढीस लागले आहे. खरे तर ठाणे पोलिसांना आणि ठाणे लोहमार्ग पोलिसांना चोरट्यांचे एक नवे आव्हान असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नौपाडा पोलीस ठाण्याच्या आधी घडलेल्या चोरीच्या प्रकारामुळे आणि चोरट्यांनी कार्यालय फोडून प्रवेश करीत किमती वस्तू लांबवल्याची घटना दाखल झाल्यानंतर नौपाडा पोलीसही अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहेत. नौपाडा शिवाजी पथ परिसरातील एका कार्यालय फोडून चोरट्यांनी मोबाईल, पीसी आणि लॅपटॉप चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. नवीमुंबईतील तक्रारदार सुशांत चव्हाण (वय ३५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १२ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७.१५ ते १३ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान नाईकवाडी, शिवाजी पथ येथील गुरु प्रेरणा बिल्डिंगमधील दुसऱ्या मजल्यावरील त्यांच्या कार्यालयात कोणी नसताना चोरट्याने खिडकीतून आत प्रवेश केला. तसेच त्या कार्यालयातील डेस्कवर ठेवलेला मोबाईल, पीसी तसेच केबिनमध्ये ठेवलेला लॅपटॉप असा २१ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg