loader
Breaking News
Breaking News
Foto

देवलीत महिला दिनानिमित्त वेशभूषा व नृत्य स्पर्धा उत्साहात संपन्न

मालवण (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत देवली आणि देवलीला ग्रामसंघ, वरची देवली यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त “रोजच्या रूटीन लाइफमधून बाहेर पडून साजरा करूया एक उनाड दिवस ‘ती’चा!” या संकल्पनेतून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धाना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या व परीक्षक म्हणून मालवणी मालिका, नाट्य व सिने अभिनेत्री नमिता गावकर तसेच नृत्यांगना व आहार-आरोग्य तज्ञ डॉ. गार्गी ओरसकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. यावेळी व्यासपीठावर डॉ. सुमेधा नाईक, वाघवणे पोलीस पाटील गौरी चव्हाण, माजी सरपंच गायत्री चव्हाण, सीआरपी मंजुषा मेस्त्री, देवलीला ग्रामसंघाच्या अध्यक्षा मधुरा महेश गोवेकर, अ‍ॅड. रुपेश आळवे, देवलीचे सरपंच श्याम वाक्कर आदी उपस्थित होते. या स्पर्धांमध्ये विविध वयोगटांतील पन्नासहून अधिक स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. निकाल पुढीलप्रमाणे - वेशभूषा स्पर्धा- लहान गट (१ ते ७ वर्षे) : प्रथम- आदिश्री नाईक, द्वितीय- श्रीशा चव्हाण, तृतीय- तस्मय गोवेकर, उत्तेजनार्थ- वैदेही धुरी, गीतांश गोवेकर. मध्यम गट (८ ते १५ वर्षे) : प्रथम- श्रावणी गणपत चव्हाण, द्वितीय- नुपूर मंगेश चव्हाण, तृतीय- शर्वरी सत्यवान गावडे, उत्तेजनार्थ- प्रणिता गुरुनाथ चव्हाण. खुला गट (१५ वर्षे पुढे) : प्रथम- शोभा सुधीर चव्हाण, द्वितीय- वेदा वैभव चव्हाण, तृतीय-सीमा विलास चव्हाण, उत्तेजनार्थ- मंजुषा शामसुंदर मेस्त्री.

टाइम्स स्पेशल

समूह नृत्य स्पर्धा- लहान गट (५ ते १० वर्षे) : प्रथम- ‘बाई पण भारी देवा’ (युती मेस्त्री, आर्या मेस्त्री, अनुष्का मेस्त्री, रूची सांडव), द्वितीय- ‘आम्ही शिवकन्या’ (प्रणिता, वेदी, श्रावणी आणि खुशी चव्हाण), तृतीय- ‘दिल है छोटासा’ (आद्या चव्हाण, श्रीशा चव्हाण, श्रावणी श्रीधर चव्हाण). खुला गट (११ वर्षे पुढे) : प्रथम-कोळी नृत्य (मधुरा गोवेकर, संचिता गोवेकर), द्वितीय- दिंडी नृत्य (गार्गी चव्हाण, समीक्षा चव्हाण, गायत्री चव्हाण, मेघाली, शोभा चव्हाण, वेदी, श्रावणी, खुशी, प्रणिता, काव्या, हर्षिका). वैयक्तिक नृत्य- लहान गट : प्रथम- श्रावणी गणपत चव्हाण, द्वितीय- वेदी गोविंद चव्हाण, तृतीय- आराध्या वैभव चव्हाण. यावेळी देवलीला ग्रामसंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आणि विविध गटप्रमुखांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg