loader
Breaking News
Breaking News
Foto

कामथे येथे दिव्यांग ओळखपत्र कार्ड शिबीर दि.२० मार्च रोजी

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील पात्र दिव्यांगलाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर २०२५ पासून दरमहा रक्कम रुपये २५०० /- अदा करण्यात येत आहेत. सदर अर्थसहाय्य दिव्यांग लाभार्थ्यांना देण्याकरीता शासनाकडून SAS प्रणाली मध्ये संबंधित लाभार्थ्यांचा UDID नोंदविणे तसेच सदरच्या UDID CARD ला संबंधित लाभार्थ्यांचे आधार कार्ड मॅपिंग / लिंक असणे (ekyc) गरजेचे आहे. काही दिव्यांग लाभाथ्यांकडे अद्यापही आरोग्य विभागाकडून यापूर्वी दिलेले ऑफलाईन (हस्तलीखीत/प्रिंटेड) दिव्यांग प्रमाणपत्र आहे अथवा कोणतेही दिव्यांग प्रमाणपत्र नाही अशा लाभार्थ्यांचे Unique Disability ID (UDID) काढणे करिता उपजिल्हा रुग्णालय, कामथे येथे दिनांक २० मार्च २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये फक्त अस्थिव्यंग, नेत्ररोग, बैध्दिक अक्षम व मानसिक आजार या प्रकारच्या दिव्यांगत्वाची तपासणी करण्यात येईल. कर्णबधीर तसेच रक्त संबंधित विकार यांची तपासणी शिबीरात होणार नाही याची नोंद घ्यावी.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

Unique Disability ID (UDID CARD) काढणे करिता ग्रामपंचायत कार्यालय, महा-ई-सेवा केंद्र, आपले सरकार केंद्र अथवा प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यालयातील संगणक ऑपरेटर यांचे मार्फत https://swavlambancard.gov.in या वेबलिंक वर आवश्यक त्या माहीतीसह ऑनलाईन अर्ज शिबीराच्या किमान २ दिवस अगोदर दाखल करावा. त्याचबरोबर तपासणीकरीता येताना दिव्यांग नोंदणी फॉर्म (रिसीप्ट नाही), रत्नागिरी जिल्हयातील आधार कार्डची छायांकित प्रत व आजाराचे जुने तपासणी रिपोर्ट घेवून येणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांकडे यापूर्वीचे एका सहीचे प्रमाणपत्र असल्यास Online Surender चा फॉर्म भरुन ओपीडी नं. २९, शासकीय वैदयकीय महाविदयालय व रुग्णालय, रत्नागिरी या ठिकाणी शिबीराच्या पूर्वी जमा करणे आवश्यक आहे. तरी ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत अर्थसहाय्य मिळते पंरतु त्यांचेकडे अ‌द्यापही Unique Disability ID (UDID CARD) नाही तसेच अन्य शासकीय योजनांचा लाभ घेणेकरीता Unique Disability ID (UDID CARD) काढलेले नाही व ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया पूर्ण केली आहे अशा लाभार्थ्यांनी आपला लाभ चालू राहण्याकरीता दिनांक २० मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत उपजिल्हा रुग्णालय कामथे ता. चिपळूण येथील आयोजित शिबीरामध्ये उपस्थित राहून तपासणी करावी असे आवाहन तालुका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असल्याचे गुहागरचे तहसीलदार परीक्षित पाटील यांनी केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg