loader
Breaking News
Breaking News
Foto

वैभववाडी तालुका कृषी विभागाच्या वतीने आयोजित कृषी महोत्सवाचे उद्घाटन

वैभववाडी (प्रतिनिधी) - वैभवाडी तालुका कृषी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या कृषी महोत्सवाचे उद्घाटन सभापती सिद्धेश रावराणे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी उपसभापती सांची कोलते, उपविभागीय कृषी अधिकारी उमाकांत पाटील, जि. प. सदस्य प्रमोद रावराणे, रिद्धी सुतार, श्रावणी रावराणे, प. स. सदस्य देवानंद पालांडे, सुवर्ण संसारे, साधना नकाशे, जयेंद्र रावराणे, गटविकास अधिकारी वाघ, तालुका कृषी अधिकारी आर. एस. सावंत, मंगेश कदम, विस्तार अधिकारी प्रकाश अडुळकर आदी शेतकरी सरपंच, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कृषी महोत्सवाला तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठा सहभाग घेतला होता. आपण पिकवलेले वेगवेगळी पिके प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली होती. सर्व प्रकारचे शेतीविषयक स्टॉल उभारण्यात आले होते. भात, नाचणी, वरी, फणस, आंबा, काजू, नर्सरी मासे, अंडी तसेच कृषी तंत्र विद्यालय सांगुळवाडी च्या वतीने आधुनिक अवजारांचा स्टॉल उभारण्यात आला होता. हे प्रदर्शन पाहण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg